AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
छोट्या गावांमध्ये होणार मोठा व्यवसाय!
व्यवसाय कल्पनाTV9 Marathi
छोट्या गावांमध्ये होणार मोठा व्यवसाय!
➡️ शेतीमध्ये अमुलाग्र बदल करत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याकडे राज्य सरकार व केंद्र सरकार लक्ष देत असतं. ➡️ शेतकरी गटासाठी “मिनी डाळ मिल” गावस्तरावर शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून केवळ शेतीच नाही तर शेतीशी निगडीत व्यवसायांवर भर देण्यात आला आहे. यामधीलच “मिनी डाळ मिल” हा उपक्रम राबिविला जात आहे. या व्यवसायातून फक्त शेतकऱ्यांनाच नव्हे ते युवकांचा सुद्धा फायदा होणार आहे. अटी – ➡️ कडधान्यावर प्रक्रिया करून डाळ करण्यासाठी गावातच व्यवसाय उभा करता यावा यासाठी सरकार आर्थिक सहाय्य देऊन मदत करत आहे. यासाठी शेतकरी गट किंवा महिला गटाची स्थापना गावात असायला हवी. अनुदान ➡️ राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य अंतर्गत एकूण खर्चाच्या ६० टक्के रक्कम किंवा १ लाख २५ हजार रुपयांचे अनुदान शेतकरी गट किंवा महिला गटाला दिले जाते. तसेच कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गतही अनुदान देण्याची तरतूद आहे. अल्प भुधारक तसेच महिला बचत गटासाठी एकूण खर्चाच्या ६० टक्के किंवा १ लाख ५० हजार रुपये हे अनुदान दिले जाते. यामाध्यमातून डाळमिलची उभारणी होऊ शकते. भुधारकांसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के रक्कम तर १ लाख २५ हजार अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. अर्ज याठिकाणी जमा करा- 1) डाळमिलसाठी असलेले अनुदान मिळवण्यासाठी 7/12, आठ ‘अ’ 2) शेतकरी गटाच्या स्थापनेची नोंदणी 3) आधार कार्ड शिवाय शेतकरी गटाच्या नावाने अर्ज हा तालुका कृषी कार्यालयाकडे द्यावा लागणार आहे. 4) कृषी विभागाच्या पुर्वसंमतीनंतरच शेतकरी गटाला डाळ मिल देण्यात येणार आहे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- TV9Marathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
4
इतर लेख