AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
चेरी टोमॅटोची लागवड करा आणि मिळवा दर्जेदार उत्पादन!
अॅग्री डॉक्टर सल्लाkrishi jagran
चेरी टोमॅटोची लागवड करा आणि मिळवा दर्जेदार उत्पादन!
➡️चेरी टोमॅटो दिसायला रंगीबेरंगी आणि खायला रसाळ असल्याने याची बाजारात कायमच मोठी मागणी बघायला मिळते. विशेष म्हणजे चेरी टोमॅटोची शेती करणे तुलनेने खूपच सोपे आहे. . असे अनेक लोक आहेत ज्यांना चेरी टोमॅटोची शेती करायची आहे. त्यामुळे आज आपण चेरी टोमॅटोच्या लागवडीबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ➡️चेरी टोमॅटो या पिकाची लागवड चांगल्या पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी अशी शिफारस केली जाते. मित्रांनो तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की हे टोमॅटो वसंत ऋतूच्या सुरवातीला लावले जातात. 👉या टोमॅटोचे रोप तयार करण्यासाठी, बियाणे ट्रे मातीने भरा. 👉ट्रेच्या बियाणे टाकण्याच्या ठिकाणी सुमारे 1⁄2 सेमी खोल खड्डा किंवा छिद्र करा. 👉नंतर त्यामध्ये बिया पेरून नंतर बियाणे मातीने झाकून टाका. 👉या टोमॅटोची अंकुरण प्रक्रिया 5 ते 7 दिवसात सुरू होतं असते. 👉रोप तयार झाल्यानंतर ते ट्रेमधून काढून घ्या आणि जमिनीत लावा. 👉चेरी टोमॅटोला दिवसा 6 ते 8 तास सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे यामुळे पिकाची वाढ चांगली होते. 👉टोमॅटोला सहा तास पूर्ण सूर्यप्रकाश, निवारा, हवेशीर परिस्थिती आणि कंपोस्ट खताची आवश्यकता असते, यामुळे चेरी टोमॅटो पिकापासून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. 👉जेव्हा चेरी टोमॅटोची झाडे झपाट्याने वाढू लागतात तेव्हा झाडे पडण्यापासून रोखण्यासाठी बांबूच्या साहाय्याने त्यांना आधार द्यावा लागतो. 👉जमिनीत ओलसर कायम असायला हवी म्हणजे जमीन खूप कोरडी राहू देऊ नका कारण याचा फळांवर नकारात्मक परिणाम होतो ज्यामुळे फळाला तडे जाऊ शकतात किंवा कुजतात. 👉प्रत्यारोपणानंतर, 65 ते 70 दिवसांत चेरी झाडाला फळे यायला सुरुवात होते. 👉पूर्ण पिकलेला टोमॅटो मोठ्या टोमॅटोपेक्षा मऊ असतो. 👉चेरी टोमॅटोच्या अनिश्चित जातीला जोपर्यंत पाणी आणि खत मिळत राहील तोपर्यंत ते फळ देत राहतात. ➡️संदर्भ:- krishi jagran, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
1
इतर लेख