कृषि वार्तादैनिक भास्कर
चीनमध्ये वाढली भारतीय लाल मिरचीची मागणी
नवी दिल्ली: चीनमध्ये मिरचीची पिके खराब होत असल्याने, भारतीय लाल मिरचीची मागणी वाढली आहे. या कारणामुळे लाल मिरचीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. भारताने लाल मिरचीची निर्यात करण्यासाठी चीनसह एका करारावर स्वाक्षरी केली आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने सांगितले की, वाणिज्य सचिव अनूप वधवन यांनी चीनचे सीमा शुल्क उपमंत्री ली गुओ यांच्या बरोबर मिरची खरेदीसाठी करार केला आहे.
या करारामुळे भारतात मिरची उत्पादक शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळेल. बैठकीत दोन्ही पक्षांनी एकमेकांसोबत व्यापार करताना निर्माण होणारे अडथळे यांच्यावर चर्चा केली. संतुलित व्यापाराला प्रोत्साहन देण्याबाबत दोघांचे सहमत झाले. २००३ यावर्षी सर्वप्रथम भारतीय आंब्यावर चीनने करार केला होता. मोदी सरकारच्या कार्यकालमध्ये बासमती तांदूळ, तंबाकू व मिरचीवर करार केला आहे. चीनला आंबा, कारल, द्राक्षे, मोहरी, बासमती तांदूळ, बिगर बासमती तांदूळ, मासे व तंबाखूच्या पानांची निर्यात केली जाते. संदर्भ - दैनिक भास्कर, ९ मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
29
0
इतर लेख