AgroStar
चला, सुधारित तंत्रज्ञानाने करूया लसणाची शेती
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
चला, सुधारित तंत्रज्ञानाने करूया लसणाची शेती
आपल्या कडील लसणाचे सरासरी हेक्टरी उत्पादन ९ मे टन इतकेच आहे. देशात लसणाचा तुटवडा जाणवू लागतो त्या वेळी भाव भरमसाठ वाढतात. आपल्या उत्पादकांना चीन मधून येणाऱ्या लसणामुळे मोठ्या आव्हानास सामोरे जावे लागते. कांदा किंवा इतर भाज्यांपेक्षा लसणाची लागवड खर्च जास्त येतो, कारण बियाणे महाग असते. पिकांची वाढीस अधिक कालावधी लागतो. लागवड व काढणीसाठी मजुरी जास्त लागते आणि तुलनेने उत्पादन कमी मिळते. चांगल्या लागवड व्यवस्थापनातून चांगले व दर्जेदार उत्पादन मिळू शकते. तापमान लसून हे थंडीला प्रतिसाद देणारे पिक आहे. वाढीच्या काळात थंड आणि किंचित दमट हवामान, तर गड्डा परिपक्व होताना काढणीच्या काळात कोरडे हवामान हवे असते. देशभर ९० टक्के लसणाची लागवड नोव्हेंबर महिन्यात होते. गड्ड्यांची वाढ सुरु होण्यापूर्वी पानांची संख्या भरपूर असली आणि त्यांची वाढ चांगली झाली तरच अधिक उत्पादनाची हमी असते. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या काळात रात्रीचे कमी तापमान झाडांच्या वाढीस पोषक ठरते. फेब्रुवारी, मार्च या काळात रात्री तापमान कमीच राहते; परंतु दिवसाच्या तापमानात वाढ होते. हवेतील आद्रता कमी होते आणि गड्डा पोसू लागतो. जमीन जमीन भूसभूशीत आणि कसदार लागते.
मध्यम काळ्या जमिनीत सेद्रिय खतांचा पुरवठा चांगला असल्यास उत्पादन चांगले मिळते. भारी काळ्या किंवा चोपण जमिनीत गड्ड्यांची वाढ चांगली होत नाही. पाण्याचा चांगला निचरा न होणाऱ्या जमिनी टाळाव्यात. लागवड उन्हाळ्यात खोल नांगरट करून दोन ते तीन कुलव्याच्या पाळ्या द्याव्यात. हरळी, लव्हाळाच्या गाठी किंवा पुर्वपिकाची धसकटे वेचून घ्यावीत. हेक्टरी १० ते १५ टन शेणखत शेवटच्या कुळवनिद्वारे जमिनीत मिसळून द्यावे. लागवडी साठी २*४ किंवा ३ *४ मीटर अंतराचे वाफे करावेत. जमीन सपाट असेल तर दीड ते दोन मीटर रुंदीचे आणि १० ते १२ मीटर लांबीचे सरे करता येतात. लसूनपाकळ्या टोकन करून लावाव्या लागतात. निवडलेल्या पाकळ्या सपाट वाफ्यात १५*१० से. मी. अंतरावर व दोन से. मी. खोलीवर लावाव्यात. रुंदीशी समांतर वाफ्यात दर १५ से. मी. अंतरावर खुरप्याने रेषा पडून त्यात १० से. मी. अंतरावर पाकळ्या उभ्या ठेवाव्यात व नंतर मातीने झाकून घ्याव्यात. लागवडीपूर्वी पाकळ्या कार्बेन्डेझिम व कार्बोसल्फान द्रावणात दोन तास बुडवून लागवड करावी. दहा लिटर पाण्यात 20 मी. ली. कार्बोसल्फान व २५ ग्राम कार्बेन्डेझिम मिसळून द्रावण तयार करावे. खत आणि पानी नियोजन – पिकला एकरी ४० किलो नत्र,२० किलो स्फुरद,२० किलो पालाश लागते लागवडीच्या वेळेस नत्राची अर्धी मात्रा व स्फुरद,पालाशची पूर्ण मात्रा द्यावी नत्राची राहिलेली मात्रा दोन हप्त्यातून द्यावी .पाणी पाकळ्या कोरड्यात लावल्यानंतर लगेच पाणी द्यावे उगवण झाल्यावर आठ ते दहा दिवसाच्या अंतराने जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात अमोनिअन सल्फेटचा वापर केल्यास आवश्यक गंधकाची मात्रा पिकास मिळते . रोगनियंत्रण – तपकिरी करपा –पानांवर तपकिरी रंगाचे लांबट चटके पडतात चट्ट्याचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात त्यामुळे वाढ खुंटते व गड्ड्याचा आकार लहान राहतो. नियंत्रण -१० ते १५ दिवसाच्या अंतराने २५-३० ग्राम मॅन्कोझेब किंवा २० ग्राम कार्बेन्डेझिम प्रती १० लिटर पाण्यात कीटकनाशंकासोबत आलटून पालटून फवारावे. डॉ शैलेंद्र गाडगे (कांदा व लसून संशोधन संचानालय राजगुरूनगर जि. पुणे) अग्रोस्टार अग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस ५ डिसे १७
167
3
इतर लेख