चक्रीवादळाच्या निर्मितीने थंडीवर परिणाम!
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
चक्रीवादळाच्या निर्मितीने थंडीवर परिणाम!
महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब सुरुवातीस दोन दिवस राहील. मात्र त्याचवेळी बंगालचे उपसागरावरील चेन्नईपासून ४५० कि. मी वर हवेचे दाब पुन्हा कमी होत असून निवार चक्रीवादळानंतर पुन्हा दुसरे चक्रीवादळ निर्माण होत असून पुन्हा चेन्नईच्या दिशेने येत आहे. बंगालच्या उपसागरात हि वादळे १० अक्षांशावर व ८३ रेखांशावर तयार होत असून दक्षिण व आग्नेयेकडून येणारे उष्ण वारे महाराष्ट्राच्या भागातही येत आहेत. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, पूणर, सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे या भागात हवेच्या कमीदाबाचे क्षेत्रे निर्माण होऊन अल्पशा पावसाची शक्यता निर्माण होत आहे. हिवाळी हंगामात थंडीचे प्रमाण वाढण्या ऐवजी ते कमी होत आहे. हीच स्थिती ५ डिसेंबर पर्यंत राहणे शक्य आहे. त्यामुळेच कोकणात कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस पर्यंत राहील. उत्तर महाराष्ट्रात व मराठवाड्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सिअस राहील. विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातही कमाल व किमान तापमानात घट होणार नाही. हवामान बदलाच्या प्रभावाने थंडीवर परिणाम झाल्याचे स्पष्ट होत असून नोव्हेंबर महिन्याचे अखेरीस आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पुन्हा बंगालच्या उपसागरात तयार होणारी चक्रीवादळे हवामान बदलास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळेच ईशान्य वाऱ्याचा तसेच उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव कमी झाला असून हवेच्या दबावरही त्याचे सातत्याने परिणाम होत आहेत. चांगल्या थंडीच्या प्रभावही कालावधी कमी होत आहे. याचा परिणाम या वर्षीचे उसाच्या रिकव्हरीवर होईल. मात्र या हवामानाचा फायदा ज्वारी पिकास होईल. शेतकरी मित्रांनो वरील हवामानाच्या अंदाजानुसार आपण पिकाचे नियोजन व संरक्षण करावे. १. कपाशीची वेचणी सकाळी करावी. त्यामुळे काडी कचरा कापसाला लागणार नाही. सध्याचे हवामान कापूस वेचणीसाठी अनुकूल आहे. २. रब्बी ज्वारीच्या पिकास १ कोळपणी व खुरपणी करून पीक तणविरहित ठेवावे. तसेच बागायती ज्वारी पिकास युरिया खताचा दुसरा हप्ता द्यावा. ३. करडई पिकावरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी शिफारशीनुसार कीटकनाशकाची फवारणी करावी. संदर्भ - डॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ) हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
111
7
इतर लेख