AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
चक्क ..! गवताची लागवड करून रोखता येते  जमिनीची धूप !
गुरु ज्ञानAgrostar
चक्क ..! गवताची लागवड करून रोखता येते जमिनीची धूप !
🍀खरिपातील पिक हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने जास्तीच्या पावसाच्या पाण्याने जमिनीची धूपही मोठ्या प्रमाणात होत असते. जमिनीची धूप रोखण्यासाठी पॅरा गवताची लागवड केल्यास चांगला फायदा दिसून येतो. पॅरा गवताचा वापर जनावरांसाठी हिरवा चारा म्हणूनही करता येतो. 🍀चांगल्या प्रतीचा चारा मिळण्यासाठी चारा पिक लागवडीचे नियोजन करणे गरजेचं आहे. यामध्ये योग्य चारा पिकांची निवड, जमिनीचा पोत, पाण्याची उपलब्धता यानुसार व्यवस्थापन गरजेचं आहे. 🍀पॅरागवत बहुवार्षिक एकदल चारा पिक आहे. ज्याची दमट हवामानात आणि सर्व प्रकारच्या जमिनीत वाढ चांगली होते. पॅरागवताची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला जून आणि जुलैमध्ये करावी. जास्त थंडीमध्ये या गवताची वाढ खुंटते. पॅरा गवताच्या लागवडीसाठी जमिनीची नांगरणी करून घ्यावी. सोबतच पेरणीपूर्वी दोन वखरणी करून घ्याव्यात. 🍀सरासरी उंची १७०-१९० सें.मी. वाढते. सुरवातीला इतर चाऱ्यामध्ये मिसळून पॅरा गवत जनावरांना द्यावे. लागवड करताना एक हेक्टर जमिनीसाठी ७५००० ठोंब्यांची गरज पडते. लागवड ६० × ३० सेंटीमीटर अंतरावर करावी. या गवतामध्ये ७ टक्केपर्यंत प्रथिने, ०.७६ टक्के कॅल्शिअम, ०.४९ टक्के फॉस्फरस असते. 🍀लागवड केल्यानंतर पॅरागवताची पहिली कापणी ६५ ते ७० दिवसांनी करावी. एकूण ७ ते ८ कापण्या मिळतात. या कापण्या ४० ते ४५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. एक हेक्टर क्षेत्रातून ९० ते १०० टन प्रती हेक्टरी चाऱ्याचे उत्पादन मिळते. 🍀संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
40
15
इतर लेख