AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
चंद्रावर आलेला कापसाचा कोंब कोमेजला
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
चंद्रावर आलेला कापसाचा कोंब कोमेजला
बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत नाही, त्या भागात ‘चांग इ-४’ हे अवकाशयान चीनने काही दिवसांपूर्वी उतरविले आहे. त्या यानातून नेलेले कापूस व बटाट्याचे बी पेरण्यात आले होते. त्यापैकी कापसाला कोंब फुटले होते. चंद्रावर रात्रीचे तापमान उणे १७० अंशांपर्यंत उतरल्याने कोंब कोमेजल्याचे जाहीर करण्यात आले. सूर्याच्या प्रकाशात कापसाची वाढ चांगली होत होती. मात्र रात्री तापमान घटल्यानंतर कोंब नष्ट झाले. चंद्रावर एक रात्र दोन आठवडे असते. या दरम्यान तेथील तापमानात मोठ्या प्रमाणात घसरते. चीनने 3 जानेवारीला अंतरिक्ष यान चांग ई-4 के सोबत कापूस, बटाटा ल मोहरीचे बी पाठविले होते. यामध्ये फक्त चंद्रावर कापसाला कोंब फुटले. बाकी दोन पिकांच्या बाबतीत काहीच बदल घडले नाही. मात्र वैज्ञानिकांनी बटाटा व मोहरीला अंकुर फुटतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. चीन हा पहिला असा देश आहे की, ज्यांनी चंद्रावर एखादे बीज पेरले आहे. चीनचे अवकाशयान एजेंसी (सीएनएसए) ने एका फोटोच्या माध्यमातून कापसाला कशा प्रकारे कोंब फुटले आहे हे दर्शविले आहे. या प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ शाय गेंगशिन म्हणाले, चीनच्या या प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ शाय गेंगशिन म्हणाले, ‘कापसाचा कोंब लवकरच मरेल, असा आमचा अंदाज होता. रात्रीच्या वेळी चंद्रावर कोणतेही रोप जिवंत राहणे शक्‍यच नाही.
पीक व बी हे चंद्रावर त्याचे विघटन होईल आणि याचा चंद्रावरील वातावरणावर काहीही परिणाम होणार नाही. शाय म्हणाले, “ चंद्रावर पिके उगविण्याचा प्रयोग पहिल्यांदा केला होता. चांग ई-४ मध्ये पाणी आणि मातीने भरलेले १८ सेमी. चा एक डब्बा पाठविला गेला होता. या डब्ब्याच्या आतमध्ये बी च्या सोबत फळ माशीचे अंडे व आंबवण पाठविले होते. यामध्ये एक हीट नियंत्रण ठेवणारी सिस्टम, दोन छोटे कॅमेरे होते ज्यामध्ये बीज अंकुरित होण्याचे फोटो मिळाले. संदर्भ - दैनिक भास्कर, १७ जानेवारी २०१९
46
0