समाचारAgrostar
घर बसल्या दुरुस्त करा पॅनकार्ड वरील चूक!
👉 सरकारी कामात किंवा शेतीच्या योजनांसाठी अर्ज करत असताना आपल्याला पॅन कार्ड ची आवश्यकता असते परंतु अनेक वेळा पॅन कार्डमध्ये नाव चुकलेले असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जर तुमच्या पॅन कार्डमध्ये देखील चुक झाली असल्यास तुम्ही खाली सांगिलतेल्या पद्धतीने सहज घरबसल्या त्यात दुरुस्ती करू शकता.
1.सर्वप्रथम, Income Tax Department च्या वेबसाइटवर जा.
2. "Online Services" टॅबवर क्लिक करा.
3. पॅन सेवेच्या अंतर्गत पॅन कार्ड पुनर्मुद्रण/दुरुस्ती/पत्त्यात बदलाची विनंती (Request for PAN Card Reprint/Correction/Change of Address) अशा टॅबवर क्लिक करा.
4. त्यांनातर "Apply Online" वर क्लिक करा.
5.आता, तुमचा पॅन क्रमांक, जन्मतारीख आणि लिंग प्रविष्ट करा.
6. "I am not a Robot" चेकबॉक्सवर क्लिक करा.
7. त्यानंतर "सबमिट" वर क्लिक करा.
8.आता, तुम्हाला एक नवीन पेज दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या नावातील दुरुस्तीसाठी आवश्यक माहिती टाकावी लागेल.
Your Current Name: हे तुमचे सध्याचे नाव आहे जे तुमच्या पॅन कार्डवर चुकीचे लिहिलेले आहे.
Your Correct Name: हे तुमचे योग्य नाव आहे जे तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर प्रिंट करायचे आहे.
9. एकदा आपण सर्व माहिती टाईप केल्यांनतर, "सबमिट" वर .
तुम्हाला एक Acknowledgement Number मिळेल. हा Acknowledgement Number जपून ठेवा.
👉तुमची नाव बदलण्याची विनंती मंजूर होण्यासाठी 15-20 दिवस लागू शकतात. एकदा तुमची नाव बदलण्याची विनंती मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला एक नवीन पॅन कार्ड मिळेल ज्यावर तुमचे योग्य नाव छापून येईल. लक्षात घ्या की तुमची नाव बदलण्याची विनंती मंजूर न झाल्यास, तुम्हाला कारणे दाखवा नोटीस मिळेल. ही नोटीस तुमची नाव बदलण्याची विनंती नाकारण्याचे कारण देईल. तुम्ही या कारणांशी सहमत नसल्यास, तुम्ही त्यांना अपील करू शकता.
👉संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.