क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्तान्युज १८ लोकमत
घर कर्ज झालं स्वस्त, 31 मार्चपर्यंत खास ऑफर!
👉घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे बँकांनी गृहकर्जाचे व्याजदर कमी केले असून, आता अतिशय अल्प व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध होणार आहे. 👉यामुळे सध्या गृह खरेदीसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे, मात्र ही सवलत ३१ मार्चपर्यंतच मिळणार असल्यानं ग्राहकांनी वेळीच निर्णय घेणं आवश्यक आहे. 👉देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेनं कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. भारतीय स्टेट बँकेनं गृहकर्जाचे व्याजदर ७० आधारभूत अंकांनी स्वस्त केले आहेत. 👉म्हणजेच गृहकर्जाचे व्याजदर आधीच्या दरापेक्षा 0.7 टक्क्यानं घटवले आहेत. त्यामुळं बँकेच्या गृहकर्जाचा व्याजदर ६.७० टक्के झाला आहे. 👉स्टेट बँकेनंही ही सवलतीचा व्याजदर ३१ मार्च पर्यंतच मिळणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच ३१ मार्चपर्यंत कर्ज प्रक्रिया शुल्कही माफ करण्याची घोषणा केली आहे. 👉त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँकेनं एक मार्चपासून आपले गृहकर्जाचे व्याजदर १० आधारभूत अंकांनी कमी केले असून, त्यांचा व्याजदर हा आता ६.६५ टक्के आहे. हा व्याजदर देशात सर्वात कमी असल्याचा दावा बँकेनं केला आहे. 👉व्याजदरातील ही सवलत फक्त ३१ मार्चपर्यंत मिळणार असून, कर्ज घेणाऱ्यांचा क्रेडीट स्कोअर आणि लोन टू व्हॅल्यू गुणोत्तराशी व्याजदर जोडलेले असल्याचं बँकेनं स्पष्ट केलं आहे. 👉त्याशिवाय देशातील अनेक महत्त्वपूर्ण बँकांनीही आपले व्याजदर कमी केले आहेत. यामध्ये सरकारी आणि खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांचा समावेश आहे. 👉गृहकर्जाचे व्याजदर कमी झाल्यानं घर घेण्यासाठी इच्छुक लोकांना दिलासा मिळाला आहे. गृहकर्ज स्वस्त झाल्यानं गृह खरेदीदारांना प्रोत्साहन मिळेल आणि गृहखरेदीला चालना मिळेल, पर्यायानं कोरोना संकटामुळे थंडावलेल्या घरांच्या बाजारपेठेत चैतन्य निर्माण होईल याचा फायदा बांधकाम व्यवसायाला होईल,असा विश्वास व्यक्त होत आहे. संदर्भ -न्युज १८ लोकमत, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
84
23
संबंधित लेख