AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
घरीच बनवा सेंद्रिय एमिनो एसिड!
जैविक शेतीAgrostar
घरीच बनवा सेंद्रिय एमिनो एसिड!
➡️ऍमिनो ऍसिड वापरण्याचे फायदे : 👉🏻कोणत्याही पिकाची सेटिंग करण्यास मदत करते. 👉🏻झाडांची व फुलांची,फळांची सेटिंग चांगली होती. 👉🏻झाडामध्ये क्लोरोफिलचे प्रमाण वाढून पिके/रोपे अधिक हिरवीगार होतात ➡️ऍमिनो ऍसिड बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू : एक किलो गूळ, एक किलो सोयाबीन आणि 150 ग्रॅम बेसन पीठ ➡️बनवण्याची पद्धत : 👉🏻पाच लिटर पाण्याची टाकी किंवा भांडे.घ्या.सर्वप्रथम आपल्याला एक किलो सोयाबीन पाच लिटर पाण्यामध्ये आठ तास भिजत घालायचे आहेत. 👉🏻नंतर ते भिजलेले सोयाबीन आहेत असे त्या पाण्याबरोबर मिक्सरमधून बारीक करून काढायचे आणि त्यामध्ये एक किलो गूळ आणि 150 ग्रॅम बेसन पीठ बारीक करून टाकायचे आहे. 👉🏻जर पाणी पाच लिटर पेक्षा कमी झाले असेल तर त्यामध्ये पाच लिटर पाणी होईल एवढे पाणी टाकावे .ॲमिनो ॲसिड बनण्यासाठी सात दिवसाचा कालावधी लागतो . 👉🏻सात दिवस आपल्याला ते मिश्रण रोज सकाळी काठीच्या साह्याने हलवायचे आहे. 👉🏻सात दिवसांनी ते मिश्रण सुती कापडाच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे.आत्ता ते पूर्ण पणे फवारणे योग्य ॲमिनो ॲसिड तयार झालेले आहे. 👉🏻फवारायचे प्रमाण- 500 मिली प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारायचे आहे. दहा दिवसाच्या अंतराने फवारणी घेतल्यास योग्य तो परिणाम दिसतो. ➡️संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
54
17