कृषी वार्तालोकमत
घरबसल्या केंद्र सरकारमार्फत २.२५ लाख रुपये मिळविण्याची संधी!
➡️ केंद्र सरकारने तरुणांना २.२५ लाख रुपये जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. बक्षीसाची ही रक्कम जिंकण्यासाठी तुम्हाला दोन स्पर्धांमध्ये भाग घ्यावा लागेल. केंद्र सरकारने जनतेला तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जागरुक करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. ➡️ केंद्र सरकारने आपला अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट करून या स्पर्धेबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारकडून एकूण दोन स्पर्धा आयोजित केल्या असून, २.२५ लाख रुपयांचे बक्षीस मिळवण्यासाठी तुम्हाला दोन्ही स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे लागेल. या स्पर्धेबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे. ➡️ जर तुम्हाला शॉर्टफिल्म बनवण्याची आवड असेल तर तुम्ही जागतिक तंबाखूविरोधी दिवस २०२१ वर आधारित तम्बाखूच्या दुष्परिणामावर आधारित शॉर्टफिल्म बनवू शकता. ही शॉर्टफिल्म किमान ३० सेकंद आणि कमाल ६० सेकंदांची असली पाहिजे. ➡️ आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना वगळून १८ वर्षे पूर्ण केलेले इतर सर्व प्रौढ नागरिक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक २ लाख रुपये, दुसरे पारितोषिक १ लाख ५० हजार रुपये, तिसरे पारितोषिक १ लाख रुपये, उत्तेजनार्थ १० जणांना प्रत्येकी १० हजार रुपये, अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ➡️ या स्पर्धेची सुरुवात ३१ मे २०२१ पासून झाली आहे. शॉर्टफिल्म पाठवण्याची शेवटची तारीख ३० जून आहे. स्पर्धेसंबंधीच्या अधिक माहितीकरिता https://www.mygov.in/task/short-film-making-contest या लिंकवर जाऊन माहिती घेता येईल. निबंध लेखन स्पर्धा ➡️ भारत सरकारने जागतिक तंबाखू विरोधी दिवस २०२१ निमित्त निबंध स्पर्धेचेही आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही २५ हजार रुपयांचे बक्षीस जिंकू शकता. स्पर्धेसाठी आठवी, नववी, दहावी, ११वी-१२वी, पदवीपर्यंतचे कॉलेजचे विद्यार्थी असे गट करण्यात आले आहेत. ➡️ निबंधलेखनासाठी एक हजार शब्दांची शब्दमर्यादा आहे. निबंध एक हजार शब्दांच्या आत असला पाहिजे. त्यापेक्षा अधिक शब्दसंख्या असल्यास निबंध रिजेक्ट केला जाईल. स्पर्धेची सुरुवात ३१ मे २०२१ पासून झाली असून, निबंध जमा करण्याची अंतिम तारीख १८ जून आहे. या स्पर्धेसंबंधीच्या अधिक माहितीसाठी https://www.mygov.in/task/essay-writing-competition/ या संकेतस्थळावर संपर्क साधावा. संदर्भ:- लोकमत. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
23
इतर लेख