AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
घरबसल्या ऑनलाईन करा कार्डवरील चुका दुरुस्त!
समाचारAgroStar
घरबसल्या ऑनलाईन करा कार्डवरील चुका दुरुस्त!
👉🏻रेशन कार्ड हे भारत सरकारने जारी केलेले एक महत्त्वाचं दस्तऐवज आहे, तुम्हाला कोणतंही महत्वाचं काम करायचं असेल तर त्यासाठी महत्वाचे असते ते म्हणजे राशन कार्ड. ज्याद्वारे सरकार लोकांना वाजवी दरात रेशन पुरवते. याची सुरुवात 1940 साली झाली. रेशनकार्ड हे राज्य सरकार जारी करते आणि ते ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते. 👉🏻राशन कार्डला शिधापत्रिका ही म्हणतात. पण कधी कधी हे फार जुनं असल्यामुळे यात काही बदल करायचं झालं किंवा काही चुक असेल तर ते बदलणं खुप मोठी प्रोसेस असते असं लोकांना वाटतं पण तसं नाही. काही चूक असेल तर ती आता अगदी सहज सुधारता येणार आहे, यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. 👉🏻ऑनलाइन प्रक्रिया काय आहे? - सर्वप्रथम तुम्हाला अन्न आणि पुरवठा विभागाच्या https://epds.nic.in/ वेबसाइटवर जावे लागेल. - होम पेजवर तुम्हाला “रेशन कार्ड करेक्शन” चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. - एक नवीन पृष्ठ उघडेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा रेशनकार्ड क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल. - त्यानंतर तुम्हाला “शोध” बटणावर क्लिक करावे लागेल. - तुमच्या रेशन कार्डची माहिती स्क्रीनवर दिसेल. - आता तुम्हाला अपडेट करायची असलेली माहिती बदलावी लागेल. - सर्व माहिती बदलल्यानंतर तुम्हाला “सबमिट” बटणावर क्लिक करावे लागेल. 👉🏻जर तुम्हाला ऑनलाइन प्रक्रियेबद्दल काळजी वाटत असेल तर तुम्ही ऑफलाइन प्रक्रियेचा देखील अवलंब करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या भागातील अन्न आणि पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागेल. तेथे तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल. तुम्हाला तुमची सर्व माहिती अर्जात अचूक भरावी लागेल. याशिवाय, तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे देखील सादर करावी लागतील. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल. तुम्ही तुमचे रेशन कार्ड मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अपडेट करू शकता. 👉🏻संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
1
इतर लेख