AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
घरबसल्या ऑनलाइन चेक करा; तुम्हाला मिळणारी गॅस सबसिडी!
कृषि वार्तामहाराष्ट्र टाइम्स.कॉम,
घरबसल्या ऑनलाइन चेक करा; तुम्हाला मिळणारी गॅस सबसिडी!
👉आपल्यापैकी अनेकांकडे एलपीजी कनेक्शन आहे. १२ सिलिंडर एका कनेक्शनवर बुक केले जाऊ शकतात. करोना काळात कोणीही गॅस बुक केल्यास त्या व्यक्तीची सबसिडी अमाउंट त्याच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केली जात होती. उदाहर्णार्थ जर गॅस ६६० रुपयांचा असेल तर ८६० रुपये घेतले जातात. २०० रुपये तुमची सबसिड असते. ज्याला नंतर बँक खात्यात ट्रान्सफर केले जाते. 👉काही जण सबसिडीचा फायदा घेतात. आता हे केवळ ३० ते ३५ रुपये आहे. त्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे क्रेडिट करण्यात येते की नाही, हे तपासणे गरजेच आहे. अनेकदा आपल्या सबसिडीचा पैसा कोणत्याही त्रासाविना पैसे आपल्या अकाउंटमध्ये जातात. मात्र, कधी कधी चुकून हे पैसे खात्यात पोहोचत नाहीत. त्यामुळे ट्रान्झॅक्शन वरून ही माहिती मिळू शकते. जाणून घ्या तुम्हाला तुमच्या सबसिडीचा पैसा तुमच्या अकाउंटमध्ये जात आहे की नाही. असे जाणून घ्या १. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या फोनमधील इंटरनेट ओपन करावे लागेल. त्यानंतर फोनच्या ब्राउजरमध्ये जा. या ठिकाणी तुम्हाला www.mylpg.in टाइप करून ते ओपन करावे लागेल. २. यानंतर उजव्या बाजुला गॅस कंपनीच्या गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल. जो तुमच्या सर्विस प्रोव्हाइडर आहे. या गॅस सिलिंडरच्या फोटोवर टॅप कारा. ३. यानंतर एक नविन विंडो ओपन होणार. ही विंडो तुमच्या गॅस सर्विस प्रोव्हाइडर आहे. यावरील सर्वात वरच्या उजव्या बाजुला साइन अप आणि न्यू यूजरचा ऑप्शन दिला आहे. त्यावर टॅप करा. ४. जर तुमची आयडी आधीच बनवली असेल तर साइन अप करावे लागेल. जर आयडी नसेल तर तुम्हाला न्यू यूजरवर टॅप करावे लागेल. वेबसाइटवर लॉगिन करा. ५. यानंतर विंडो ओपन होईल. त्यात उजव्या बाजुला व्ह्यू सिलिंडर बुकिंग हिस्ट्रीचा पर्याय असेल. यावर टॅप करा. या ठिकाणी तुम्हाला माहिती होईल की, कोणत्या सिलिंडवर किती सबसिडी दिली आहे व कधी दिली आहे. ६. जर आपण गॅस बुक केली आहे. व तुम्हाला सबसिडीचे पैसे मिळाले नाहीत. त्याच्या फिडबॅकच्या बटनावर क्लिक करावे लागेल. या ठिकाणी सबसिडीचा पैसे न मिळण्याची तक्रार करता येऊ शकते. ७. याशिवाय, जर तुमच्या एलपीजी आयडीला आतापर्यंत आपल्या अकाउंटला लिंक केले नसेल तर तुम्ही डिस्ट्रिब्यूशनकडे जाऊन ते करू शकता. ८. याशिवाय, तुम्ही १८००२३३३५५५ वर फ्री कॉल करू शकता. यावर आपली तक्रार नोंदवू शकतात. संदर्भ - महाराष्ट्र टाइम्स.कॉम, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
56
5
इतर लेख