AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
घरगुती वीजग्राहकांना सौरऊर्जा यंत्रणेसाठी ४० टक्के  अनुदान!
समाचारलोकसत्ता
घरगुती वीजग्राहकांना सौरऊर्जा यंत्रणेसाठी ४० टक्के अनुदान!
➡️महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना छतावरील सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी ४० टक्क्यांपर्यंत अनुदान देणारी योजना राज्यात राबवली जाणार आहे. सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत होईल. ➡️केंद्र शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या छतावरील सौरऊर्जा योजना (रुफटॉप सोलर) टप्पा दोन अंतर्गत महावितरणसाठी २५ मेगावॉटचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे. ➡️या योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे. ➡️घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॉटपर्यंत ४० टक्के तर ३ किलोवॉट ते १० किलोवॅटपर्यंतची सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. ➡️छतावरील सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यासाठी महावितरणने परिमंडळनिहाय संस्थांची नेमणूक केली आहे. त्यांच्या नावांची यादी व ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. खर्च आणि बचतीचे अर्थकारण ➡️पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह छतावरील सौर ऊर्जानिर्मितीची यंत्रणा बसवण्यासाठी एक किलोवॉट क्षमतेसाठी ४६,८२० रुपये खर्च येईल. तीन किलोवॉट क्षमतेची यंत्रणा बसवण्यासाठी १,२४,१४० रुपये खर्च येईल. त्यामध्ये ४० टक्के अनुदानाप्रमाणे ४९,६५६ रुपयांचे केंद्र सरकारचे अनुदान मिळेल व ग्राहकाला प्रत्यक्षात ७४,४८४ रुपयांचा खर्च करावा लागेल. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांची मासिक सुमारे ५५० रुपयांची बचत होईल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-लोकसत्ता, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
166
55
इतर लेख