AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ग्राहक सेवा केंद्र' सुरु करण्यासाठी सरकारकडून मिळते कर्ज !
नोकरी आणि शिक्षणAgrostar
ग्राहक सेवा केंद्र' सुरु करण्यासाठी सरकारकडून मिळते कर्ज !
➡️ग्रामीण भागामध्ये विविध प्रकारच्या व्यवसायांच्या चांगल्या संधी उपलब्ध असतात.जर आपण ग्रामीण भागातील राहणाऱ्या जनतेचा विचार केला तर बहुतांशी कृषी क्षेत्रात गुंतलेले हे लोक आहेत. तसे पाहायला गेले तर ग्रामीण भागांमध्ये ज्या काही आवश्यक सोयी सुविधा असतात त्या फार कमी असतात.याबाबतीत उदाहरणच द्यायचे झाले तर, बँकेत खाते उघडणे, एखाद्याला पैसे पाठवणे, आधार आणि पॅन कार्ड बनवणे इत्यादी कामे ग्रामीण भागातील लोकांना बऱ्याचदा पूर्ण करण्यासाठी शहराकडे जावे लागते.अशा पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात जर तुम्ही ग्राहक सेवा केंद्र उघडले तर महिन्याला वीस ते पंचवीस हजार पर्यंत सहज उत्पन्न मिळणे शक्य आहे. ➡️ग्राहक सेवा केंद्र कसे उघडावे? 👉🏻यासाठी तुम्हाला अगोदर कुठल्यातरी बँकेशी संपर्क साधावा लागेल व तुमचे शिक्षण आणि तुम्ही करू शकणारी गुंतवणूक याबद्दल बँकेने तुम्हाला विचारल्यावर याबद्दलची माहिती तुम्हाला द्यावी लागेल. ही प्रक्रिया बँकेत पार पडल्यानंतर तुम्हाला मंजुरी दिली जाईल. 👉🏻यामध्ये तुम्हाला एक युजरनेम आणि पासवर्ड देखील मिळतो. दुसरा पर्याय म्हणजे ग्राहक सेवा केंद्र उघडण्यासाठी डिजिटल इंडिया सीएसपी ला भेट द्यावी लागेल व या ठिकाणी तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल. या ठिकाणी तुम्हाला ज्या बँकेत काम करायचे आहे त्या बँकेच्या लिंक वर क्लिक करावी लागेल. सीएसपीसाठी लागणारी पात्रतेची माहिती बँक लिंक च्या मुख्य पेजवर दिलेली असते. 👉🏻या मुख्य पेज वर तुम्हीनोंदणी पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म दिसेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे संपूर्ण माहिती सादर करावी लागेल. ही जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण होण्यासाठी साधारणतः 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो. ➡️यातून कसे मिळू शकते उत्पन्न? 1- बँक खाते उघडणे आणि पैसे पाठवणे- यामध्ये लोक त्यांच्या बँक खात्यातून मिनी एटीएम प्रमाणे पैसे काढू शकतात. यासाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होते.तुम्ही दिवसातून काही वेळा करू शकता म्हणजेच नोकरीची वेळ संपल्यानंतरही ते सुरू करता येते किंवा घरातील कोणत्याही सदस्य ते चालवू शकतात व या माध्यमातून तुम्हाला कमिशन मिळते. 2- बँक मित्र म्हणून कमिशन- या माध्यमातून बँक मित्रांना कमिशन मिळते. याचे उदाहरणच द्यायचे झाले तर आधार कार्ड ने बँक खाते उघडण्यासाठी तुम्हाला 25 रुपये कमिशन मिळते तर बँक खाते आधारशी लिंक केल्यास नियमानुसार तुम्हाला कमिशन मिळते. ➡️त्यासोबतच बँक ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी प्रत्येक व्यवहारावर 0.4असे कमिशन उपलब्ध आहे. जर तुम्ही पंतप्रधान जीवन ज्योती विम्याचे खाते उघडले तर त्यावर देखील तुम्हाला 30 रुपये कमिशन मिळते. ➡️ संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
43
13