AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ग्रामीण भागातील तरुणांना HDFC बँक देणार नोकऱ्या!
समाचारTV9 Marathi
ग्रामीण भागातील तरुणांना HDFC बँक देणार नोकऱ्या!
➡️ देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) एका निर्णयामुळे आगामी काळात ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होणार आहे. एचडीएफसी बँकेने ग्रामीण भागात विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्यादृष्टीने देशातील दोन लाख गावांमध्ये बँकेच्या शाखांचे जाळे उभारण्यात येईल. यासाठी साहजिकच बँकेला कर्मचाऱ्यांची गरज भासेल. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीची संधी मिळू शकेल. ➡️ HDFC बँकेच्या माहितीनुसार,पुढील ६ महिन्यांत २५०० लोकांची भरती केली जाईल. जेणेकरून खेड्यापाड्यात बँकेच्या सेवा पोहोचवणे शक्य होईल. एचडीएफसी बँक ही देशातील सर्वात मोठी खासगी बँक आहे जिचे मुख्यालय मुंबईत आहे. ➡️ एचडीएफसी बँकेने देशातील प्रत्येक पिनकोड पत्त्याच्या परिसरात सेवा पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ही बँक सध्या देशातील ५५० जिल्ह्यांमध्ये सेवा पुरवते. एचडीएफसी बँक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात जास्तीत जास्त बँकिंग सेवा पुरवते. देशाच्या इतर भागात त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी या बँकेने २५०० कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने अद्याप याबाबत कोणतीही ठोस योजना जाहीर केलेली नाही. ➡️ मात्र, या विस्तारानंतर देशातील एक तृतीयांश ग्रामीण भागांमध्ये बँकेचे अस्तित्त्व निर्माण होईल, असे एचडीएफसीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला बँकिंग क्षेत्राशी जोडणे सोपे होईल आणि लोक जास्तीत जास्त बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकतील. क्रेडिट आणि कर्जाच्या बाबतीत, देशातील ग्रामीण आणि अर्ध-शहरी भाग अजूनही मोठ्या प्रमाणावर सेवांपासून दूर आहेत. तथापि, बँकिंग व्यवस्थेच्या शाश्वत विकासात ही क्षेत्रे मोठी भूमिका बजावू शकतात. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
45
19