AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ग्रामीण भागातील आत्मनिर्भर महिलांची कमाल! 6 लाख मास्क विकून कमावला 30 लाखांचा नफा.
सफलतेची कथान्यूज १८लोकमत
ग्रामीण भागातील आत्मनिर्भर महिलांची कमाल! 6 लाख मास्क विकून कमावला 30 लाखांचा नफा.
➡️ कोरोनामुळे कुणाचाही जीव जाऊ नये असं प्रत्येकालाच वाटतंय पण जगण्यासाठी अन्न आणि ते मिळवण्यासाठी अनेकांना लॉकडाऊन असतानाही बाहेर पडावं लागतंय. मात्र ज्या लॉकडाऊनने अनेकांवर आघात केले तसंच अनेकांसाठी नव्या संधीही निर्माण केल्या. ➡️ तेलंगणातील नव्याने स्थापन झालेल्या नारायणपेठ या जिल्ह्यातल्या महिला बचत गटाने नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. महिला बचत गटाच्या महिलांनी लॉकडाऊनच्या काळात ६ लाख मास्क तयार करून ते विकले आणि त्यातून जवळजवळ ३० लाख रुपयांची कमाई केली. समाजातील विविध थरांतील महिला या बचत गटाशी संबंधित आहेत त्यांनी एकत्र येऊन ही कामगिरी केली आहे. ➡️ नारायणपेठच्या जिल्हाधिकारी हरिचंदना यांनी या गटाला ३० लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं आणि त्यांना मोठ्या प्रमाणात मास्क तयार करायला सांगितले. राज्य ग्रामीण विकास एजन्सीची (DRDA) मार्गदर्शक तत्त्वं, जिल्हाधिकारी मॅडमचं मार्गदर्शन यांच्या आधारे या महिलांनी 6 लाख मास्क तयार केले आणि त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं ३० लाखांच अर्थसहाय्य वगळता २५ ते ३० लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवला आहे. ➡️ या उपक्रमामुळे तळागाळातील ३ हजार महिलांना रोजगार मिळाला असून त्यांच्या चरितार्थाला त्या हातभार लागला आहेत. इथं विविध प्रकारचे मास्क तयार केले जातात. इक्कत, पोचामपल्ली सिल्क, नारायणपेठ माग, १०० टक्के रेशीम वापरून तयार केलेला मास्क, डिझायनर असे अनेक प्रकार या मास्कमध्ये उपलब्ध आहेत. स्थानिक आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने या गटाने आयुर्वेदिक मास्कही तयार केला आहे. या महिला केवळ पारंपरिक पद्धतीचे मास्क तयार करत नाहीत तर मार्केटमधले ट्रेंड्स जाणून घेऊन फॅशनेबल मास्कही तयार करतात. सोशल मीडियावरून केली जाहिरात लॉकडाऊनमुळे सगळ्या महिला घरातूनच काम करत आहेत. या बचत गटाने फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईट्सवरून त्यांच्या उपक्रमाची आणि उत्पादनांची जाहिरात केली. त्यामुळे जनजागृतीही झाली आणि सरकारी संस्थांपासून आयटी कंपन्यांनीही या बचत गटाला मास्क तयार करण्याच्या ऑर्डर दिल्या. हैदराबाद मेट्रो रेल्वे, एफआयसीसीआय यांच्यासोबतच सुप्रसिद्ध कलाकार तब्बु, फराह खान आणि विजय देवरकोंडा यांनीही त्यांना मास्कची ऑर्डर दिली आहे. डेलॉइट या सॉफ्टवेअर कंपनीने या महिला बचत गटाला ६३ हजार मास्क तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. ➡️ वाढती मागणी लक्षात घेऊन या महिला सतत मास्क तयार करण्यात गुंतल्या असून आता त्यांनी आपल्या मास्क ब्रँडला ‘अरुण्या’ हे नाव दिलं असून तो लवकरच नावारूपाला येईल असा त्यांना विश्वास वाटतो. हा महिला बचत गट बांबुची उत्पादनं, घरगुती लोणची ही उत्पादनंही विकतो. ➡️ आता बचत गट एका नव्या मोठ्या जागेत स्थलांतरित होणार असून व्यवसायवृद्धीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आर्थिक मदतीसोबत आपल्या बचतीतले पैसे घालण्याचा या महिलांचा विचार आहे. ४५ लाख रुपयांच्या खर्चातून कौशल्य विकास केंद्र आधीच सुरू झालं आहे. महिलांनी लॉकडाउनच्या काळात घेतलेली भरारी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ -न्यूज १८लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
8
5