AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ग्रामपंचायतीमध्ये बसवणार पाऊस मोजण्याचे यंत्र!
कृषि वार्ताAgrostar
ग्रामपंचायतीमध्ये बसवणार पाऊस मोजण्याचे यंत्र!
➡️जिल्ह्यात गावोगावी पडणाऱ्या पावसाची अचूक मोजणी व्हावी व तेथील पर्जन्यमानाच्या नोंदींमुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला व अतिरिक्त मार्गदनर्शन मिळावे याकरीता गाव तेथे पर्जन्यमापक यंत्र बसविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात पर्जन्यमापक यंत्रांद्वारे मंडळनिहाय पाऊस मोजला जात असल्याने त्या त्या भागातील पावसाची अचूक आणि इत्थंभूत नोंदणी होतेच असे नाही. परंतु, ग्रामपंचायत क्षेत्रात ही यंत्रे बसविली तर तेथील दैनंदिन पावसाच्या अचूक नोंदी घेणे शक्य होत आहे. ➡️या यंत्रांद्वारे पावसाच्या दररोजच्या नोंदी घेऊन त्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्या जातात. मंडळनिहाय पडलेल्या पावसाच्या नोंदींवरून तालुक्यातील पावसाची सरासरी काढली जाते. पर्जन्यमानाचा अचूक अंदाज येऊन शेतकऱ्यांना पीक लागवडीबाबतचे मार्गदर्शन तसेच विविध योजनांचा योग्य लाभ मिळवून देणेही शक्य होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. ➡️पर्जन्यमानाचा अचूक अंदाज येऊन यामुळे शेतकऱ्यांना पीक लागवडीबाबतचे मार्गदर्शन तसेच विविध योजनांचा योग्य लाभ मिळवून देणेही शक्य होणार आहे. जिरायती गावे, कमी पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये याची खूप आवश्यकता आहे. एकूण पावसाचे दिवस, दोन पावसांतील अंतर, पावसाची तीव्रता, दिवसवार, आठवडावार आणि महिनावार पावसाचे मोजमाप हे काही वर्षे केले, की या नोंदीचा संदर्भ घेऊन गावच्या पावसाचा पॅटर्न काही प्रमाणात का होईना निश्चित करता येतो. ➡️पावसाच्या तीव्रतेवर जमिनीतील हवेतील आर्द्रता बदलते, त्यामुळे पिकावर पडणारे बुरशीजन्य रोग किंवा कीड अशा इतर समस्यांची चाहूल आणि जाणीव पावसाची आकडेवारी समजली की लवकर होते. त्यावर आधारित खते, कीटकनाशके आणि इतर उपाययोजना करण्यास पुरेसा अवधी मिळतो. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळणे हे पर्जन्यमापकाच्या मदतीमुळे शक्य होते. ➡️संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
1
इतर लेख