किसान कृषि योजनाशेतकरी मासिक
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
योजनेची ठळक वैशिष्ठे-
1) शेतकऱ्याने स्व:ता किंवा त्यांच्या वतीने संस्थेने या योजनेत पुन्हा स्वतंत्ररित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही शासनाकडून सर्व खातेदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरण्यात येतो.
2) योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विहित केलेले कागदपत्र वगळता अन्य कोणतेही कागदपत्रे वेगळ्याने सादर करण्याची आवश्यकता नाही.
- लाभार्थी पात्रतेच्या अटी व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे -
1) महाराष्ट्र राज्यातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदीनुसार असलेला शेतकरी
2) शेतकरी म्हणून त्याचा ७/१२ व ८ अ चा उतारा
3) शेतकऱ्याचे वारस म्हणून तलाठ्या कडे गाव नमुना
- लाभाचे स्वरूप –
1) अपघाती मृत्यू - २००००० रु
2) एक डोळा किंवा एक अवयव निकामी होणे -१००००० रु
- महत्त्वाचे मुद्दे –
1) शासनाने नेमलेले अधिकृत विमा सल्लागार जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि. नागपूर यांच्या मार्फत पाठवण्यात येतात
2) सल्लागार कंपनीचा टोल फ्री नं १८००२३३३५३३ यांचेशी संपर्क साधावा. विमा कंपनी कडून मंजूर होणारी रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा होते.
- विमा प्रस्ताव सादर करण्याची पद्धत –
शेतकरी वारसदाराने विमा कालावधीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे पाठवायचा आहे .जिल्हा कृषी अधिकारी प्रस्तावाची नोंद घेऊन शासनाच्या विमा सल्लागार यांच्या विभागीय कार्यालयाकडे पाठवतील.