AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेत ७७८ प्रस्तावांना मंजुरी!
कृषी वार्तासकाळ
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेत ७७८ प्रस्तावांना मंजुरी!
➡️ राज्यातील शेतकऱ्यांसाठी २०१५-१६ या वर्षांपासून राज्य शासनाकडून (स्व.) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. २०१६ ते २०२० या चार वर्षांत नगर जिल्हा कृषी विभागाकडे एकूण एक हजार १६२ प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी ७७८ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. ➡️ २३८ प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले. ६१ प्रस्ताव विमा कंपनीकडे, तर त्रुटी असलेले ८५ प्रस्ताव जिल्हा कृषी कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. १३ प्रस्ताव कालावधी संपल्यानंतर दाखल झाले आहेत. या योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. ➡️ शेतीव्यवसाय करताना अनेकदा शेतकऱ्यांचे अपघात होतात. अंगावर वीज पडणे, सर्प-विंचूदंश, विजेचा धक्का बसणे, तसेच अपघातात मृत्यू होतो. घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर कुटुंबाची आर्थिक होरपळ होते. त्यामुळे अपघातग्रस्त शेतकरी, तसेच त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक साह्य करण्यासाठी राज्य शासनाने ही विमा योजना सुरू केली. अशी आहे योजना👇 ➡️ या योजनेत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये, अपघातात दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख, एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये भरपाई मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळत आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात प्रस्तावांत त्रुटी आढळून येत असल्याने जनजागृतीची गरज व्यक्त होत आहे. ➡️ काही त्रुटी असल्याने विमा कंपनी व तालुका कृषी कार्यालयाकडे जे प्रस्ताव प्रलंबित आहेत, ते कागदपत्रांची पूर्तता करून पुन्हा मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. संदर्भ:- सकाळ. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
7
इतर लेख