AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 गोणपाट वापरून तपासा बियाण्याची उगवणशक्ती !
गुरु ज्ञानAgrostar
गोणपाट वापरून तपासा बियाण्याची उगवणशक्ती !
बियाण्याची उगवणशक्ती तपासण्यासाठीची गोणपाट पद्धत : शेतकरी बंधुंनी एक मोठे पोते घ्यावे व एक पाण्याने भरलेली बादली घ्यावी घेतलेल्या पोत्याला कात्रीच्या साह्याने व्यवस्थित कापून घ्यावे कापलेल्या पोत्याला पाण्यात भिजवून नंतर व्यवस्थित पिळून घ्यावे. सोयाबीन बियाणे तील शंभर दाणे तपासणीसाठी घ्यावेत. हे शंभर दाणे त्या पोत्यावर व्यवस्थित ओळीत घेऊन ठेवायचे आहेत. नंतर त्या पोत्याची व्यवस्थित गुंडाळी करून घ्यायचे आहे व एखाद्या दोरीने बांधून घ्यायचे आहे. हि पोत्याची केलेली गुंडाळी माठाजवळ थंड ठिकाणी ठेवायचे आहे त्यावर दररोज दोन वेळेला पाणी शिंपडायचे आहे. आठ दिवस झाल्यानंतर हे गुंडाळी उघडायची असून आठव्या दिवशी बियाण्याची उगवण झालेली असते उगवण झालेले बियाणे एकदम सरळ उगवल असेल तर समजायचं ते बियाणे दर्जेदार असून लागवडीस व्यवस्थित आहे.
11
0
इतर लेख