समाचारthe focus india
गॅस सिलिंडरवर मिळणार ३०० रुपये सबसिडीचा लाभ!
घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर देखील आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. गॅस सिलिंडर आता ९०० रुपयांवर पोहोचला आहे. वाढत्या सबसिडीची रक्कम घरगुती सिलिंडरच्या रकमेत केंद्र सरकारने वाढ केली आहे.आधी प्रति गॅस सिलिंडर १५३.८६रुपये सबसिडी मिळत होती. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. प्रति सिलिंडर २९१.४८रुपये सबसिडी दिली जात आहे. विशेष म्हणजे, तुमच्याकडे उज्ज्वला योजनेंतर्गत कनेक्शन असेल तर तुम्हाला ३१२.४८ रुपयांपर्यंत सबसिडी मिळेल. आधी सबसिडीची रक्कम १७४.८६ रुपये इतकी होती.कसे बचत कराल ३०० रुपये गॅस सिलिंडरवर मिळणाऱ्या सबसिडीचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर आधी तुम्हाला बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करावे लागेल. जर तुमचं एलपीजी कनेक्शन आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीचा लाभ घेता येणार नाही. तुम्ही घरबसल्या आधार कार्ड लिंक करू शकतात. इंडेन गॅस कंपनीचे ग्राहक https://cx.indianoil.in वर क्लिक करून सविस्तर माहिती घेऊ शकतात. भारत गॅस कंपनीचे ग्राहक https://ebharatgas.com वर क्लिक करून एलपीजी कनेक्शन आधार कार्ड लिंक करू शकतात. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- the focus.india, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
78
17
इतर लेख