AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, नवे दर काय?
कृषी वार्ताtv9marathi
गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, नवे दर काय?
➡️ भारतीय तेल विपणन कंपन्यांनी जून महिन्यांसाठी घरगुती गॅस दर जाहीर केले आहेत. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरची नवीन किंमत जाहीर करतात. तेल कंपन्यांनी जून महिन्यात विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या 14.2 किलो किंमतीत कपात केलेली नाही. म्हणजेच हा सिलिंडर जुन्या किंमतीतच मिळणार आहे. नवी दिल्लीत अनुदानित गॅस सिलिंडरची सध्याची किंमत ही 809 रुपये आहे. मात्र दिल्लीत 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. हा सिलिंडर 1473.5 रुपयांना उपलब्ध असेल. मुख्य शहरांतील गॅस सिलेंडरचे दर शहरं - किंमत दिल्ली - 809.00 रुपये मुंबई - 809.00 रुपये कोलकाता - 835.50 रुपये चेन्नई - 825.00 रुपये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत काय? सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटनुसार, दिल्लीतील 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 122 रुपयांची कपात करण्यात आली आहे. यानंतर दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर्सची किंमत 1473.5 रुपये होती. कोलकातामध्ये या सिलिंडरच्या किंमतीत 123 रुपयांनी घट करण्यात आली असून तो 1544.5 रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत हा सिलिंडर 122.5 रुपयांनी घसरुन 1422.5 रुपये इतका झाला आहे. तसेच चेन्नईमध्ये 122.5 रुपयांनी घसरून 1603 रुपयांवर गेले. एलपीजी किंमत कशी तपासाल? एलपीजी सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या संकेतस्थळावर जावे लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) इ या संकेतस्थळावर आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- tv9marathi. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
1
इतर लेख