AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुवत्तापूर्ण उत्पादनासाठी एकात्मिक कीड, रोग व अन्नद्रव्ये व्यवस्थापन कसे करावे?
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
गुवत्तापूर्ण उत्पादनासाठी एकात्मिक कीड, रोग व अन्नद्रव्ये व्यवस्थापन कसे करावे?
➡️ सध्याच्या काळात कीड व रोग नियंत्रणासाठी सर्रास रासायनिक कीटकनाशके व बुरशीनाशके यांचा बेसुमार वापर केला जातोय. त्यामुळे याचे खालील दुष्परिणाम आढळून येतात. ➡️ उत्पादनामध्ये रासायनिक घटकांचे अंश आढळून येतात त्यामुळे विविध आजारांचे प्रमाण हे मानव तसेच प्राण्यांमध्ये वाढले आहे. ➡️ कीड व रोगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होऊन ते नियंत्रित होत नाही ➡️ बेसुमार रसायनांमध्ये शेतकऱ्याचा खर्च वाढून उत्पादनात घट येते ➡️ पाणी, हवा, माती यांची गुणवत्ता कमी होऊन जैवविविधतेवर त्याचे वाईट परिणाम झाल्याचे आढळून आले आहेत. यासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या पीक लागवडीपासून खालील बाबी लक्षात घेऊन उत्पादान घेणे महत्वाचे आहे. • पीक लागवडीपूर्वी घेण्याची काळजी - लागूपाठ एकच पीक एकाच जमिनीवर करणे टाळावे, अगोदरचे पीक काढून झाल्यांनतर एक खोलगट नांगरणी करून अगोदरच्या पिकाचे सर्व अवशेष व तण नष्ट करावे. पिकाच्या गरजेनुसार व्यवस्थित बेड तयार करून शक्य असल्यास योग्य मल्चिंग चा वापर करावा. जेणेकरून अगोदरच्या पिकाचा कीड रोगाचा प्रादुर्भाव पुढील पिकास येणार नाही. • बियाण्याची निवड व लागवड - कीड व रोग प्रतिरोधक तसेच निरोगी आणि बीजप्रक्रिया केलेल्या वाणांची निवड करावी. बियाण्याची/रोपांची लागवड योग्य कालावधीत, ठराविक अंतरावर योग्य पद्धतीचा अवलंब करून करावी. • पाणी व्यवस्थापन - शक्य असल्यास पाण्याचा सामू आणि विद्युत वाहकता तपासून घ्यावा. स्वच्छ पाण्याचा वापर ड्रीप अथवा स्प्रिंकलरद्वारे पिकास करावा. जमिनीत वापसा राहील यापद्धतीने पाण्याचा वापर करावा. • खत व्यवस्थापन - मशागत करताना चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर करावा, सुरुवातीला वाढीच्या अवस्थेत जैविक जिवाणूणूयुक्त खतांचा वापर ठिबक अथवा आळवणी द्वारे करावा. रासायनिक खतांची मात्रा देताना मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा पिकाच्या वाढीच्या गरजेनुसार वापर योग्य प्रमाणात वापर करावा. शक्य असल्यास माती परीक्षण करून खतांची योग्य मात्रा द्यावी. • कीड व रोग व्यवस्थापन - पीक लागवड केल्यानंतर अथवा बियाणे उगवून आल्यानंतर पिवळ्या व निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा, फुलोरा अवस्थेपूर्वी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. जेणेकरून पिकात कुठल्या रसशोषक कीड व फळमाशी चा प्रादुर्भाव आहे व किती प्रमाणात आहे हे समजते व त्यानुसार आपल्याला पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार व किडीच्या असणाऱ्या प्रादुर्भावावरून योग्य त्या रसायनाची निवड करून फवारणी घेणे सोपे जाते. सुरुवातीला जैविक अथवा सेंद्रिय औषधांचा वापर फवारणी साठी करावा नंतर रासायनिक औषधे फवारणी साठी वापरावे. त्याचबरोबर लागूपाठ एकाच रसायनाचा वापर पिकास करणे टाळावा. औषाधांचा चांगला परिणाम दिसण्यासाठी औषधांचे वापरण्याचे योग्य प्रमाण, फवारणीची योग्य वेळ आणि योग्य पद्धत हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर कुठल्या कीड, रोगाचा प्रादुर्भाव व कुठले पीक आहे यावरून फवारणी पंपाचे नोझल निवडने गरजेचे आहे. तसेच विविध रसायनांचे एकत्रित मिश्रण करण्यापूर्वी ते योग्य आहे कि नाही हे तपासून पाहणे गरजेचे आहे. तयार केलेलं औषधांचे द्रावण दोन तासापेक्षा जास्त काळ राहणार नाही याची काळजी घ्यावी. • पीक काढणी नंतर घ्यावयाची काळजी - पिकाची योग्य पक्क्वतेनंतर काढणी करावी. शक्य झाल्यास पीक पक्क्वतेसाठी घातक रसायनांचा वापर करणे टाळावा. उत्पादन जास्त काळ टिकवण्यासाठी व वाहतुकीसाठी योग्य पॅकिंग मटेरियल चा वापर करावा. तसेच हवा खेळती राहील यापद्धतीने धान्य, कडधान्ये व कांदा साठवून ठेवावा. वरील सगळ्या बाबी लक्षात घेऊन पीक व्यवस्थापन केलं तर नक्कीच अतिरिक्त वापरण्यात येणाऱ्या रसायनांचा वापर कमी होईल व कीड, रोग यांना नियंत्रित ठेऊन गुणवत्तापूर्ण उत्पादनात भर पडेल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
32
6