AgroStar
 गुलाब पिकातील भुरी रोगासाठी उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
गुलाब पिकातील भुरी रोगासाठी उपाययोजना!
सकाळच्या वेळी असणारे दव व आर्द्र वातावरण तसेच दिवसभर व रात्री असणारे कोरडे वातावरण भुरी रोगाच्या वाढीसाठी पोषक असते तसेच पोटॅश अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे भुरीची सफेद रंगाची बुरशी गुलाबाच्या पानांवर, देठावर तसेच कळीवर आढळून येते. पानावर जमा झालेली बुरशी प्रकाशसंश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण करते तसेच गुलाबाच्या फुलांची गुणवत्ता कमी करते. यावर उपाय म्हणून कार्बेन्डाझिम 50 % डब्ल्यू पी घटक असलेले बुरशीनाशक @ 1 ग्रॅम व 0:0:50 विद्रव्य खत @ 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
2
इतर लेख