AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरांमधील गोचीड नियंत्रण कसे करायचे !
पशुपालनAgrostar
गुरांमधील गोचीड नियंत्रण कसे करायचे !
➡️जनावरांमध्ये विविध प्रकारचे परजीव आढळतात.त्यांपैकी एक म्हणजे गोचीड. भारतामध्ये बहुतांश ठिकाणी ही परजीवी आढळून येते .नेमकी गोचीडम्हणजे काय हे आपण आज बघुयात. १. जनावरांमध्ये जे महत्त्वाचे जीवघेणे आजार होत असतात ते पसरवण्याचे काम गोचीड करत असते. २. प्रामुख्याने जनावरांची जी उत्पादनक्षमता आहे ती गोचीड याच्या प्रादुर्भावामुळे कमी होत असते. ३. गोचीड मुळे होणाऱ्या विविध प्रकारच्या आजारांमुळे जनावरे दगावतात तसेच दूध,मांस उत्पादनात घट येते. ४. त्यामुळे पशुपालकांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते. ५. गोचीड या जनावरांचे रक्त शोषण करतात. ६. एक गोचीड साधारणतः एक ते दोन मीली रक्त पिते. ७. गोचिडांच्या चाव्यामुळे टीक पॅरॅलिसिस हा आजार जनावरांना होऊ शकतो. ८. तसेच गोचीड मुळे होणारी रक्तपेशी रोग हे सर्वात महत्वाचे असतात. ९. त्यामध्ये थायलेरि ओसीस इत्यादी प्रकारचे आजार होऊ शकतात.या आजाराचे जंतू गोचीड मध्ये असतात. ➡️जनावरांची स्वच्छ्ता कशी करावी – १. कमीतकमी आठवड्यातून दोनदा तरी स्वच्छ पाण्याने जनावरांना धुणे. २. गोठ्याचे संपूर्ण निर्जंतुकीकरण किंवा स्वच्छता ठेवली तर गोचीड नियंत्रण यापासून आपण जनावरांचा बचाव करू शकतो. ३. जनावरांच्या अंगावर एक जरी गोचीड दिसली तरी तिच्यावर दुर्लक्ष करू नये. ४. तात्काळ तिला काढून जाळून टाकावे. त्यासाठी जनावरांचे निरीक्षण सूक्ष्म रीतीने करावे. जेणेकरून जनावरांना गोचीड चा प्रादुर्भाव होणार नाही. ➡️गोचीड नियंत्रणासाठी काही औषधी वनस्पती- १. निलगिरी तेल- निलगिरी तेलाचा वापर अत्यंत उपयुक्त आहे. या तेलामुळे बाह्य परोपजीवी जनावरांच्या शरीरापासून दूर जातात. तसेच काही बाह्य परोपजीवी मरतात. 2.. कडूनिंब- कडूनिंब तेल हे बाह्य परजीवींचा नियंत्रणासाठी अत्यंत गुणकारी आहे.हे तेल जनावरांच्या शरीरावर लावावे. यास असणारा उग्र वास आणि चव यामुळे बाह्य परोपजीवी यांची भूक नष्ट होते व कालांतराने ते मरतात. ➡️गोचीड ही मोठ्या प्रमाणात हानी पोहचवू शकते आणि याचा त्रास जनावरास तसेच शेतकऱ्यांना देखील होतो .त्यामुळे वरती सांगितल्या प्रमाणे थोडी काळजी घेतल्यास गोचीड वर नियंत्रण येऊ शकते. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
1
इतर लेख