अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
गुणवत्तापूर्ण भेंडी व काढणी विषयक माहिती!
"अन्नद्रव्ये व्यवस्थापन -
भेंडी पिकामध्ये उत्तम प्रतीची भेंडी मिळण्यासाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे महत्वाचे असते. पिकामध्ये अधिक फुल व फळधारणा होण्यासाठी १३:४०:१३ @२ किलो आणि १३:००:४५ @२ किलो प्रति एकर ४ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे द्यावे तसेच चिलेटेड कॅल्शियम @१ ग्रॅम + बोरॉन @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक सुविधा उपलब्ध नाही त्यांनी २४:२४:०० @७५ किलो + कॅल्शियम नायट्रेट @१० किलो प्रति एकरी फोकून द्यावे.
काढणी:-
फुले येण्यास सुरवात झाल्यावर ६ ते ७ दिवसांत फळे काढणीस तयार होतात. भेंडीची १ ते २ दिवसांच्या अंतराने तोडणी करावी. फळे ब्लेडने किंवा चाकूने देठासह कापून काढावीत. ओरबडून काढल्यास फळांना इजा होते व फळे खराब होतात. काढणी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या थंड वेळेत केल्यास फळे बराच काळ ताजी टवटवीत राहतात. भेंडी तोडल्यावर सावलीमध्ये ठेवावीत. फळे २५० गेज जाडीच्या पॉलिथीनच्या पिशव्यांत ठेवल्यास बराच काळ टिकून राहतात.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."