कृषी वार्तालोकमत
गुडन्यूज ! आता पोस्टातूनही मिळणार स्वस्त गृहकर्ज!
➡️ गृहकर्ज घेण्यासाठी आता तुम्हाला बँकेत जाण्याची गरज राहणार नाही. जवळच्या पोस्ट ऑफिसातूनही तुम्ही स्वस्त गृहकर्ज घेऊ शकाल. ➡️ इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने एलआयसी हाऊसिंग फायनान्ससोबत भागिदारी केली असून, आयपीपीबीच्या ४.५ कोटी ग्राहकांना यामुळे एलआयसी-एचएफएलच्या गृहकर्जाची सुविधा उपलब्ध होईल. ➡️ आयपीपीबीच्या देशभरात ६५० शाखा असून, १,३६,००० बँकिंग पोहोच केंद्रे आहेत. त्यांच्या माध्यमातून आयपीपीबी वेतनधारी नोकरदारांना ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकेल. या कर्जाचा प्रारंभिक व्याजदर अवघा ६.६६ टक्के असेल. ➡️ या निवेदनात म्हटले आहे की, ज्या भागात बँकिंग सुविधा पोहोचलेल्या नाहीत अथवा अल्प प्रमाणात पोहोचलेल्या आहेत, अशा भागात स्वस्त गृहकर्जाची सुविधा या भागिदारीच्या माध्यमातून आयपीपीबी पोहोचवणार आहे. विमा कंपन्यांसोबत काम करण्याची आयपीपीबीची ही काही पहिलीच वेळ नाही. ➡️ आयपीपीबीकडे २ लाख डाक कर्मचाऱ्यांचे मोठे नेटवर्क आहे. ग्रामीण भागातही हे नेटवर्क काम करत आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
72
16
इतर लेख