AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुंतवणूक करा आणि निवृत्तीनंतर मिळवा लाखो रुपयाची पेन्शन !
योजना व अनुदानAgrostar
गुंतवणूक करा आणि निवृत्तीनंतर मिळवा लाखो रुपयाची पेन्शन !
➡️नॅशनल पेन्शन सिस्टीम ही सरकार सपोर्टेड पेन्शन योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला मॅच्युरिटी आणि पेन्शन काढण्याच्या संपूर्ण रकमेवर आयकर सूट दिली जाते. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी एनपीएस खाते उघडावे लागेल. ➡️निवृत्तीपर्यंत नियमित गुंतवणूक करावी लागते. मॅच्युरिटीनंतर तुम्ही जास्तीत जास्त 60 टक्के रक्कम काढू शकता आणि उर्वरित 40 टक्के पेन्शन दिली जाते. शिल्लक रकमेपैकी 40 टक्के रक्कम जीवन विमा कंपनीकडे सुपूर्द केली जाते, जिथून तुम्हाला आयुष्यभर पेन्शन किंवा वार्षिकी मिळणे सुरू होईल. नवीन लेबर कोडचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल; पगार कमी होणार की वाढणार? पेन्शनचं कॅलक्युलेशन समजा तुम्ही 30 वर्षांचे असाल तर मॅच्युरिटी वय 60 वर्षांपर्यंत अंदाजे 10 टक्के वाढीने गुंतणूक करणे अपेक्षित आहे. ➡️अशा स्थितीत वयाच्या 60 व्या वर्षी शून्य टक्के रक्कम काढल्यावर एक लाख रुपये मासिक पेन्शन मिळवण्यासाठी दरमहा 9000 रुपये गुंतवावे लागतील. वयाच्या 60 व्या वर्षी 40 टक्के पैसे काढल्यास 1 लाख रुपये मासिक पेन्शन मिळवण्यासाठी दरमहा 22,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यामुळे, तुमचे वय, बचतीची रक्कम, परतावा दर आणि पैसे काढण्याचा दर यावर अवलंबून, तुम्ही 50,000 रुपये किंवा रुपये 1 लाख किंवा त्याहून अधिक आजीवन पेन्शन मिळवण्याची योजना करू शकता. NPS मध्ये गुंतवणुकीवर कर लाभ देखील उपलब्ध आहेत. 👉🏻1000 रुपये देऊन खाते उघडता येते. 👉🏻NPS टियर-1 आणि टियर-2 अंतर्गत दोन प्रकारची खाती उघडली जातात. 👉🏻टियर-1 हे सेवानिवृत्तीचे खाते आहे, तर टियर-2 हे ऐच्छिक खाते आहे, ज्यामध्ये कोणतीही पगारदार व्यक्ती स्वत:च्या वतीने गुंतवणूक सुरू करू शकते. 👉🏻टियर-1 खाते उघडल्यानंतरच टियर-2 खाते उघडले जाते. एनपीएस टियर 1 सक्रिय ठेवण्यासाठी वार्षिक योगदान आधीच 6,000 रुपयांवरून 1,000 रुपये करण्यात आले आहे. 👉🏻तुम्ही ही गुंतवणूक वयाच्या 65 वर्षापर्यंत चालवू शकता. 👉🏻NPS गुंतवणुकीवर 40 टक्के वार्षिकी खरेदी करणे आवश्यक आहे. 👉🏻60 वर्षानंतर 60 टक्के रक्कम एकरकमी काढता येते. 👉🏻किमान वार्षिक गुंतवणूक न केल्यास, खाते गोठवले जाते आणि निष्क्रिय केले जाते. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
1
इतर लेख