AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गाव तिथे गोदाम-शेतमालाचे नुकसान टळणार!
योजना व अनुदानAgrostar
गाव तिथे गोदाम-शेतमालाचे नुकसान टळणार!
➡️राज्याच्या पणन विभागाने नेमलेल्या एका समितीने १९ हजार ५०० कोटी रुपये खर्चून २० हजार गावांमध्ये गोदामे उभारण्याची योजना आखली आहे. ➡️काय आहे गाव तेथे गोदाम योजना: शेतातील धान्य साठवण्यासाठी ही योजना राबवली जातेय. ज्या शेतकर्‍यांची घरे लहान आहेत त्यांना शेतमाल घरात जास्त दिवस ठेवता येत नाहीत. जागेच्या अभावी शेतकऱ्यांनी कमी दर असला तरी शेतमाल विक्रीसाठी न्यावा लागतो. तर ज्या शेतकऱ्यांकडे जागा आहे ते पत्र्याचे शेड करून शेतमाल साठवत असतात, परंतु पुरेसे जागा नसल्याने त्यांनाही शेतमाल नाईलाजाने विकावा लागतो. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेता सरकारने ही योजना सुरू केलीय. ➡️कोण असतील लाभार्थी? कोणताही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. तसेच शेतकरी, शेतकरी समूह, उत्पादन समूह, भागीदारी फर्म, एनजीओ, स्वयंसहायता समूह, महासंघ, वेगवेगळ्या कंपन्या इत्यादी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
1