सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
गाभण जनावरांची विण्याअगोदर घ्यावयाची काळजी
सर्वप्रथम गाभण जनावरांची व्यवस्था बाकीच्या जनावरांपासून वेगळ्या जागेत करावी. गोठा हा मोठा स्वच्छ कोरडा हवेशीर व भरपूर सूर्यप्रकाश असलेला असावा . गाभण जनावरांचा गोठा हा घराजवळच शक्यतो असावा. गोठ्यामध्ये जंतुनाशके फवारून घ्यावीत त्यामुळे जनावरांना आजार होणार नाहीत.
गाभण जनावरांना गुळगुळीत जागेवर बांधू नये. जमिनीवर स्वच्छ गवत अंथरावे जे प्रत्येक २ ते ३ दिवसांनी बदलावे . गाभण गाईना डोंगराळ ,उंचावरच्या भागावर चरायला नेणे टाळावे . जनावरांना व्यायामासाठी पुरेश्या प्रमाणात जागा असावी उच्च प्रतीचे पशुखाद्य वापरावे. आहारात खनिज मिश्रणाचा उपयोग करावा . गाईंना थंड ,ताजे ,स्वच्छ भरपूर प्रमाणात पाणीपुरवठा करावा . अग्रोस्टार अग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस ४ नोव्हेंबर १७
238
0
संबंधित लेख