समाचारzee news
गाढविणीच्या एक लीटर दूधाला 10 हजार रुपयांचा भाव!
➡️ दैनंदिन जीवनात साधारणपणे आपण 70 ते फार 80 रुपये प्रति लीटर या दराने दूध खरेदी करतो. पण तुमच्या माहितीसाठी उस्मानाबादमध्ये गाढविणीच्या एका लीटर दुधाला 10 हजार रुपये प्रति लीटर इतका भाव मिळतोय.
➡️ उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरात गाढविणीचं दूध चक्क दहा हजार रुपये लिटरने विकलं जातंय. विशेष म्हणजे हे दूध भोंगा लावून विकलं जातंय. उमरगा शहरातील गावठाण. या ठिकाणी पाल ठोकून नांदेड जिल्ह्यातील भोकरचं धोत्रे कुटुंबीय राहतात. त्यांच्याकडे २० गाढविणी आहेत. या गाढविणीच धोत्रे कुटुंबाचं उपजीविकेचे साधन आहे.
➡️ गाढविणीचं दूध लहान मुलांसाठी तसंच दमा आणि न्यूमोनियासाठी गुणकारी असल्याचं मानलं जातं. त्यामुळे या दुधाला विशेष मागणी असते. गाढविणीचं दूध उमरगा शहरात सध्या भोंगा लावून विकलं जातंय. विशेष म्हणजे घरासमोरच दूध काढून विक्री केली जातेय. 10 मिली लीटर दुधासाठी 100 रुपये मोजावे लागतात. सध्या कोरोनाचा काळ आहे. त्यामुळंही दुधाची मागणी वाढली आहे.
➡️ मागील २ ते ३ वर्षांपासून नांदेड भागातून ही लोकं उमरगा भागात दूध विक्रीसाठी येतायेत. गाढविणीचं दूध उपयुक्त असल्याचं उमरगावासियांचं म्हणणं आहे.
गाढविणीच्या दुधात व्हिटॅमिन डी मात्रा अधिक आहे. सौंदर्य प्रसाधनांमध्येही गाढविणीच्या दुधाचा वापर केला जातो. गाय, म्हैस आणि शेळीच्या दुधा इतकंच हे दूध सकस असल्याचं सांगितलं जातं.
👉 अॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- zee news,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.