AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गाई व म्हशींच्या संगोपनातील महत्वाच्या बाबी
पशुपालनअॅग्रोवन
गाई व म्हशींच्या संगोपनातील महत्वाच्या बाबी
भारत हा कृषिप्रधान देश असून ग्रामीण भागात गाई म्हशींना दुध उत्पादनासाठी महत्वाचा घटक मानला जातो.ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्मिती या व्यवसायातून होते. त्यामुळे या जनावरांच्या संगोपनाचा शास्रीय पद्धतीने विचार करणे आर्थिक फायद्याचे ठरते.
गाई म्हशीची निवड व निरोगीपणाचे लक्षणे – 1. गाई म्हशींची निवड करते वेळी त्यांची जात त्या जातीचे गुणधर्म रंग,रूप,शरीराची बांधणी व जनावरांची वंशावळ पाहणी करणे गरजेचे आहे. 2. जनावरांची खरेदी शक्यतो पशुपालाकाकडे केल्यास त्यांच्याकडून जनावांच्या नोंदी उदा. जन्म गाभण काळ,सरासरी दुध ,लसीकरण यांची माहिती मिळू शकते 3. जनावरे गाभण किंवा दुसऱ्या,तिसऱ्या वेताच्या घ्याव्यात त्यांचे वय सरासरी चार वर्षापर्यंत असावे कमरेची हाडे दूर असावी त्यामुळे गर्भाची वाढ व प्रसूती व्यवस्थित होते. 4. गाई व म्हैस निरोगी असावीत निरोगीपणाची ओळख तिची मऊ व चमकदार त्वचा ,ओलसर ,नाकपुडी यावरून पाहता येते डोळे शुभ्र पांढरे पाणीदार असावेत त्वचेला स्पर्श केला असता त्वचा गरम व मऊ लागायला हवी. 5. निरोगी जनावर हे कायम कान टवकारून सावध व चाणाक्ष दिसते. 6. निरोगी जनावर हे नेहमी हुंदळत चालते .रोगी जनावर एकाच जागेवर मंद असते 7. जनावर खरेदी करताना थोडे अंतर चालवून पाहावे .पायात किंवा चालण्यात काही दोष असल्यास कळते. संतुलित आहार – 1. जनावरांच्या आहारात हिरवा चारा सुकी वैरण व पशुखाद्य यांचे प्रमाण शास्रीय पने ठरवावे जनावरांच्या त्यांच्या शारीरिक वजनाच्या २.५ते ३ टक्क्यापर्यंत कोरडा आहार आवश्यक असतो. 2. जनावरांना प्रत्येक लिटर दुधासाठी ३०० ते ४०० ग्राम पशुखाद्याची गरज असते दुधावाटे बाहेर पडणाऱ्या कॅल्सिअम,फॉस्फरस अशा घटकांच्या भरपाई साठी खाद्यासमवेत ५० ते १०० ग्राम क्षार मिश्रण द्यावे 3. दुभत्या गाई म्हशींना दिवसातून ४ ते ५ वेळा चार वैरण घालावी. निवारा – 1. भविष्यात वाढणारया जनावरांची संख्या लक्षात घेऊन गोठ्याचा आराखडा तयार करावा प्रत्येक जनावरांसाठी साधारण ६५ ते ७५ चौ फुट जागा असावी . 2. गाई म्हशींना व्यायामासाठी मोकळी जागा असावी 3. गोठ्यात भरपूर प्रकाश व मोकळी हवा असावी 4. गोठ्याजवळ चौकटी जाळीचा वापर करून कुंपण करावे. लसीकरण- जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वेळेवर लसीकरण करून घ्यावे लसीकरणमुळे घटसर्प , फऱ्या,लाळ खुरकुत,अॅन्थ्रक्स , आय.बी.आर,थायालेरेसीस,यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव रोखता येते. पशुवैद्यकीय सल्ला- कोणत्याही आजाराचे लक्षण किंवा एखाद्या जनावरांचे विसंगत लक्षण दिसल्यास त्वरित पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. संदर्भ-अग्रोवन १६ ऑक्टो १७ अॅग्रोस्टारद्वारे अनुवादित
59
1