AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गहू पिकातील मावा किडीचे नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
गहू पिकातील मावा किडीचे नियंत्रण!
🌱रब्बी हंगामामध्ये गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. या किडीची पिले व प्रौढ पानांच्या पाठीमागच्या बाजूस, कोवळे शेंडे तसेच खोडावर समूहाने आढळतात.पानांतील पेशीरस शोषून घेतात. परिणामी, गहू पिकाची पाने पिवळसर रोगट होतात.त्याचप्रमाणे या किडीच्या शरीरातून स्रवलेल्या मधासारख्या गोड चिकट द्रवांवर काळी बुरशी वाढते. पानांची प्रकाशसंश्‍लेषण क्रिया त्यामुळे बंद होऊन, उत्पादनामध्ये घट होते. 🌱जास्त प्रादुर्भावग्रस्त गव्हाची रोपे किंवा झाडे मरतात. यावर उपाययोजना म्हणून थायामेथोक्सम 25% WG घटक असणारे क्रुझर कीटकनाशक @100 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी. 🌱संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
0