सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
गहू पिकातील मावा किडीचे नियंत्रण!
मावा ही कीड साधारणपणे २ ते ३ मि.मी. लांबीची फिक्कट पिवळसर हिरव्या रंगाची असते.
या किडीच्या शरीराच्या पाठीमागच्या बाजूस दोन नलिकांसारखे अवयव असतात.
नुकसानीचा प्रकार -
👉 या किडीची पिले व प्रौढ पानांच्या पाठीमागच्या बाजूस, कोवळे शेंडे तसेच खोडावर समूहाने आढळतात.
👉 पानांतील पेशीरस शोषून घेतात. परिणामी, गहू पिकाची पाने पिवळसर रोगट होतात.
👉 त्याचप्रमाणे या किडीच्या शरीरातून स्रवलेल्या मधासारख्या गोड चिकट द्रवांवर काळी बुरशी वाढते. पानांची प्रकाशसंश्लेषण क्रिया त्यामुळे बंद होऊन, उत्पादनामध्ये घट होते. तीव्र प्रादुर्भावामध्ये गव्हाची रोपे किंवा झाडे मरतात.
आर्थिक नुकसान पातळी -
👉 साधारणपणे दहा मावा किड (पिले/ प्रौढ) प्रति झाड किंवा फुटवा दिसल्यानंतर त्वरित उपाययोजना कराव्यात.
👉 नियंत्रणासाठी थायामिथोक्झाम २५% डब्ल्यूजी @४० ते ८० ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस २५% ईसी @४०० ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.
👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-154&pageName=क्लिक करा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.