अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
गहू पिकातील पाणी व्यवस्थापन!
👉 गहू पिकामध्ये पेराणीपुर्वीचे ओलित सोडून जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाच ते सहा पाळ्या लागतात. 👉 पाण्याच्या उपलब्धतेनुसार खाली दिल्याप्रमाणे पाण्याचे व्यवस्थापन करावे. १) एकाच पाणी देणे शक्य असल्यास ते पेरणीनंतर २१-२५ दिवसांनी दयावे. २) दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी व दुसरे ५५-६० दिवसांनी दयावे. ३) तीन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ५५-६० दिवसांनी तर तिसरे ७०-८० दिवसांनी दयावे. ४) चार पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ५५-६० दिवसांनी तर तिसरे ७०-८० दिवसांनी दयावे तर चौथे पाणी ९०-१०० दिवसांनी दयावे. ५) पाच पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ४०-४५ दिवसांनी तर तिसरे ५५-६० दिवसांनी, चौथे पाणी ७०-८० दिवसांनी तर पाचवे ९०-१०० दिवसांनी दयावे. ६) गहू पिकाच्या वाढीच्या नाजूक अवस्थामध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
44
7
इतर लेख