गुरु ज्ञानAgrostar
गहू पिकातील तांबेरा रोगाची लक्षणे!
🌱गहू पिकामध्ये तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर गव्हाची पाने व खोडावरील देठांवर
नारंगी, गोलाकार व आकाराने लहान पुळ्या दिसून येतात. रोगग्रस्थ पानांवर
हलके बोट फिरवल्यास नारंगी किंवा तपकिरी रंगाची बुरशी बोटास लागते.
अतिरिक्त प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याचा परिणाम पिकाच्या अन्ननिर्मितीवर होऊन
वाढीवर होतो. नियंत्रणासाठी हेक्साकोनाझोल 5% SC घटक असणारे हेक्झा
बुरशीनाशक @1 मिली प्रति लिटर घेऊन फवारणी करावी.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.