AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गहू पिकाची काढणी व साठवणूक माहिती!
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोवन
गहू पिकाची काढणी व साठवणूक माहिती!
👉 कापणी व मळणी: ➡️ गव्हाच्या काही जातींचे दाणे पीक पक्‍व झाल्यानंतर शेतात झडतात व नुकसान होते. तसे होऊ नये म्हणून पीक पक्‍व होण्याच्या २ ते ३ दिवस आधी गव्हाची कापणी करावी. कापणीवेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ टक्‍के असावे. गव्हाची मळणी यंत्राच्या साह्याने करावी. मळणी करताना गव्हाचे दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. 👉 साठवण: ➡️ गहू साठविण्यासाठी ओलावा, उंदीर, पक्षी आणि अस्वच्छतेपासून मुक्‍त अशा सुरक्षित जागेची निवड करावी. गहू साठवण्यासाठी धातूच्या पत्र्यापासून अथवा सिमेंटपासून बनवलेल्या सुधारित कोठींचा वापर करावा. पोती स्वच्छ साफ करूनच त्यात धान्य भरावे. पोती लाकडी फळ्या अथवा पॉलिथीनच्या चादरीवर ठेवावीत. ➡️ साठवणूकीच्या काळात गव्हामध्ये किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यात ओलाव्याचे प्रमाण १० टक्‍क्‍यापेक्षा कमी ठेवावे. ➡️ त्यासाठी मळणीनंतर गव्हास ३ ते ४ दिवस चांगले ऊन द्यावे. त्यानंतर गहू थंड होऊ द्यावा. त्यानंतर साठवण करावी. ➡️ शिफारस केलेल्या रसायनांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने बंद कोठीत वापर करावा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
20
3