AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गव्हामध्ये ओंबी अवस्थेत पाणी व अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
गव्हामध्ये ओंबी अवस्थेत पाणी व अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
➡️ शेतकरी मित्रांनो, गहू पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी पिकाच्या अवस्थेनुसार व आवश्यकतेनुसार पाणी देणे अत्यंत गरचेचे असते. तर आज आपण गहू पिकाला फुलोऱ्या पासून ते काढणीपर्यंत पाण्याचे कसे नियोजन करावे ते जाणून घेऊया. ➡️ पीक फुलोऱ्यात येणे - पेरणी नंतर 70-80 दिवसांनी पाणी देणे आवश्यक पुरेशा प्रमाणात न पाणी दिल्यास परागीभवन कमी होऊन दाण्याची संख्या घटते व पर्यायाने उत्पादन घटते. ➡️ दाण्यात चिक भरण्याची वेळ (पेरणीनंतर 90-100 दिवसांनी पाणी देणे आवश्यक): या अवस्थेत दाणे पोसतात, त्यांचा आकार वाढतो. परंतु जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार लहान होतो व वजन कमी होते. ➡️ दाणे टणक होण्याची अवस्था (पेरणी नंतर 100 दिवसांनी पाणी देणे आवश्यक): या अवस्थेत जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार कमी होतो. दाण्यांवर सुरकुत्या पडून प्रत निकृष्ट होते व पर्यायाने उत्पादनात घट येते. त्यामुळे या मुख्य गव्हाच्या ३ अवस्थांमध्ये पिकाला पाणी देणे गरजेचे आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
47
15