कृषी वार्ताकृषी जागरण
गव्हाच्या तीन प्रकारच्या रंगामधील वाण तयार!
कृषी जैव तज्ञांनी गव्हाच्या तीन रंगामधील वाण विकसित केले आहेत. या वाणमधील पोषकद्रव्ये हे सामान्य गव्हापेक्षा आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत. गव्हाच्या या वाणाला पंजाबच्या मोहाली येथील असलेल्या राष्ट्रीय कृषी अन्न जैव तंत्रज्ञान संस्थेने तयार केले आहेत. जांभळा, काळा आणि निळा या तीन रंगामध्ये या वाणला विकसित केले आहेत. सध्या याची शेती पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि बिहारमध्ये शंभर एकर क्षेत्रात केली आहे. या शेतीसाठी भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) द्वारे शेतीचे परिक्षण केले जात आहे. जेणेकरून लोकांना याचा अधिक लाभ मिळेल. त्याचबरोबर यापासून कोणतेही नुकसान झाले तर याची माहितीदेखील मिळेल.
एनएबीआई यांनी जपानकडून माहिती मिळाल्यानंतर २०११ पासून यावर काम सुरू केले होते. अनेक हंगामांमध्ये प्रयोग केल्यानंतर यश मिळाले आहे. रंगीत गव्हापासून आपल्याला एंथोक्यानिनचे आवश्यक मात्रा मिळू शकते. एंथोक्यानिन एक एंटीऑक्सिडेंट आहे आणि याला खाल्ल्याने हृदयरोग, मधुमेह आणि लठ्ठपणासारखे रोग रोखण्यास मदत होते. तथापि, या रंगीत गव्हाचे एकरी उत्पादन १७ ते २० क्विंटल आहे. स्रोत - कृषी जागरण, २१ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा
401
1
इतर लेख