योजना व अनुदानलोकमत
गती शक्ती योजना लाँच केली; १०० लाख कोटींची मिळणार भेट!
➡️अर्थव्यवस्थेला आणखी चालना देण्यासाठी, नवीन योजना सातत्याने सुरू केल्या जात आहेत. पंतप्रधान यांनी या वर्षी १५ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून 'गती शक्ती योजने'ची घोषणा केली होती. १०० लाख कोटी रुपयांची ही योजना लाँच करण्यात अली आहे. या योजनेचा उपयोग देशातील रोजगाराच्या संधी सुधारण्यासाठी केला जाईल. ➡️देशाच्या मास्टर प्लॅन आणि पायाभूत सुविधांचा पाया घालण्यासाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. १०० लाख कोटी रुपयांच्या या योजनेचा उपयोग देशातील रोजगाराच्या संधी चांगल्या करण्यासाठी करण्यात येणार आहे. ➡️प्रधानमंत्री गती शक्ती योजनेच्या माध्यमातून देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. ही योजना देशातील मास्टर प्लान आणि पायाभूत सुविधांचा पाया घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. या योजनेद्वारे स्थानिक उत्पादकांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवता येईल. यामुळे उद्योगांचा विकास होईल. पंतप्रधान गती शक्ती योजनेची वैशिष्ट्ये. - गती शक्ती योजनेचे एकूण बजेट १०० लाख कोटी निश्चित करण्यात आले आहे. - गती शक्ती योजनेच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. - ही योजना पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करेल. - स्थानिक निर्मात्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवले जाईल. - योजनेअंतर्गत नवीन आर्थिक क्षेत्रेही विकसित केली जातील. - आधुनिक पायाभूत सुविधांसह पायाभूत सुविधांच्या बांधकामात समग्र दृष्टिकोन स्वीकारला जाईल. - या योजनेद्वारे संपूर्ण पायाभूत सुविधांचा पाया घातला जाईल. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
2