AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गजबच ! युवकाने  केली सोलर स्टोव्हची निर्मिती !
जुगाडAgrostar
गजबच ! युवकाने केली सोलर स्टोव्हची निर्मिती !
➡️बऱ्याच व्यक्ती निरनिराळ्या प्रकारचे शोध, वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास त्यामध्ये गुंतलेली असतात. या प्रकारचे प्रयत्न करत असताना अशा प्रयत्नांमधून एखादी नवनिर्मिती होते. अशीच एका नवनिर्मितीची माहिती आणि त्याद्वारे लागलेला शोध त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ➡️सोलर स्टोव्हची निर्मिती : आपल्याला माहित आहे की स्वयंपाक करायचा म्हटलं म्हणजे आजही ग्रामीण भागामध्ये बहुतांशी प्रमाणात चुलीवर केला जातो. चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी लाकडांची आवश्यकता असते. त्यातच गॅसचा वापर देखील खूप प्रमाणात महाग ठरत आहे. या पार्श्वभूमीवर अमोघ सहजे या तरुणाने अगदी कमी खर्चा मध्ये सोलर स्टोव्हची निर्मिती केली आहे. अमोघने झिबॉम्बे आणि वाळवंटी प्रदेश सुदान या देशांमध्ये त्याचा प्रयोग यशस्वी केला आहे.अमोघ सहजे नवी मुंबईचे रहिवासी असून बेंगलोर येथील आय आय एस सी मध्ये अभियांत्रिकी एमई पूर्ण केले आहे. त्यांच्या मनामध्ये सोलर स्टोव्ह निर्मितीचे प्रेरणाही आदिवासींची स्वयंपाकासाठी लाकूड जमा करण्यासाठी होत असलेली पायपीट यामधून आली. त्यांनी सोलारस्टोव्हचे मॉडेल आदिवासी भागातील मुलांच्या मदतीने तयार केले. ➡️त्यासाठी त्यांनी आरशाचे तुकडे एका पॅनलवर लावले आणि त्याद्वारे सौर ऊर्जा केंद्रित केली. या केंद्रित सौरऊर्जेच्या माध्यमातून अन्न शिजवणाचे हे मॉडेल तयार करण्यात आले. या सोलर स्टोव्हच्या माध्यमातून कमीत कमी पाच ते सहा किलो अन्न सहजरीत्या शिजते. त्यासोबत फोडणी देणे, एखादा पदार्थ तळणे अशा सर्व कामे या स्टोव्हच्या माध्यमातून करता येतात. याच्या वापराने इंधनामध्ये 80 टक्के बचत शक्य आहे. अगोदर हे सोलर स्टोव्ह त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींना वितरित केले. त्यानंतर सुदान मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी पायलट प्रोजेक्ट मध्ये 350 सोलार स्टोव्ह करून दिले. पुण्याच्या थिंक ट्रान्स फाउंडेशन च्या माध्यमातून या संकल्पनेचा प्रसार केला जात आहे. ➡️या सोलर स्टोवची वैशिष्ट्ये : 1- अत्यंत कमी खर्चामध्ये निर्मिती झाली आहे. 2- इतर सौरऊर्जा साधनांच्या तुलनेत स्वस्त आहे. 3- स्टोवर शिजवणे, पदार्थ तळणे व फोडणी देणे शक्य होते. 4- तापमानातील बदलांचा यावर परिणाम होत नाही. 5- विस मिनिटांमध्ये अन्न शिजते. 6- गॅस सिलेंडर व अन्य इंधनामध्ये बचत होते. 7- सव्वा तीन बाय सव्वा तीन फूट जागेत स्टोव्ह बसवणे शक्य आहे. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
2
इतर लेख