AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गजबच ! दिवसाला २५ रु वाचवा आणि व्हा 25 लाखांचे मालक !
योजना व अनुदानAgrostar
गजबच ! दिवसाला २५ रु वाचवा आणि व्हा 25 लाखांचे मालक !
➡️चांगल्या भविष्यासाठी तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना चालवते. एलआयसीमधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्तम पॉलिसी चालवते. यापैकी एक म्हणजे जीवन आनंद योजना. ➡️LIC आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्तम पॉलिसी चालवते. यापैकी एक म्हणजे जीवन आनंद योजना. तुम्हाला प्रीमियमचा बोजा सहन करावा लागणार नाही आणि काही वर्षांनी तुम्हाला मोठी रक्कम मिळेल, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करू शकता. ➡️25 लाख कसे मिळवणार : जीवन आनंद पॉलिसीमध्ये तुम्ही महिन्याला सुमारे 1358 रुपये जमा करून 25 लाख रुपये मिळवू शकता. यासाठी तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागेल. ➡️जर तुम्ही जीवन आनंद योजनेत 35 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला योजनेच्या मॅच्युरिटीवर रु.25 लाख मिळतील. यासाठी तुम्हाला दररोज ४५ रुपये वाचवावे लागतील. अशा प्रकारे, तुम्हाला महिन्याचे 1358 आणि वार्षिक सुमारे 16,300 रुपये जमा करावे लागतील. ➡️अंतिम अतिरिक्त बोनस : तुम्ही ३५ वर्षांत एकूण ५.७० लाख रुपये जमा कराल. यामध्ये मूळ विमा रक्कम पाच लाख रुपये असेल. याशिवाय, 8.60 लाख रुपयांचा रिव्हिजनरी बोनस आणि 11.50 लाख रुपयांचा अंतिम अतिरिक्त बोनस दिला जाईल. जीवन आनंद पॉलिसीमध्ये दोनदा बोनस देखील उपलब्ध आहे. मात्र यासाठी पॉलिसी १५ वर्षांची असावी. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
3
इतर लेख