AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 गंधक(सल्फर) अन्नद्रव्याचे पिकांमध्ये महत्व!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
गंधक(सल्फर) अन्नद्रव्याचे पिकांमध्ये महत्व!
➡️ पिकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 17 अन्नद्रव्यांपैकी गंधक हे एक महत्वाचे दुय्यम अन्नद्रव्य आहे. ➡️ गंधक चा वापर प्रामुख्याने अन्नद्रव्यासोबतच कीटकनाशक व बुरशीनाशक म्हणून देखील केला जातो. ➡️ अन्नद्रव्यांमध्ये गंधक हे पिकाच्या वाढ व विकासासाठी महत्वाचे आहे कारण प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये याची महत्वाची भूमिका आहे. गंधक वापराचे फायदे: ➡️ पिकामध्ये तिखटपणा, तेलाचे प्रमाण, सुगंधीपणा, प्रथिने व साखरेचे प्रमाण वाढवण्यासाठी तसेच उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी गंधक उपयुक्त आहे. त्यामुळे कांदा, हळद, आले, सोयाबीन, भुईमूग, ऊस व फळभाजीपाला यासारख्या पिकांमध्ये सुरुवातीपासून गंधक चा वापर करणे गरजेचे आहे. ➡️ गंधक हे पिकास नत्र, स्फुरद, फेरस, झिंक व बोरॉन या अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देण्यास मदत करते. ➡️ गंधक हे अन्नद्रव्य उष्णता निर्माण करते त्यामुळे पावसाळ्यात जास्त ओलावा झाल्यास जमिनीत लवकर वापसा येण्यासाठी याचा वापर करतात व थंडीत पिकाला जमिनीतून उष्णता निर्माण करून देण्याचे काम करते जेणेकरून पिकाची जोमदार वाढ होण्यास मदत होते. कीड रोग नियंत्रण: ➡️ गंधक हे भुरी रोग व लाल कोळी कीड नियंत्रणानासाठी पिकांत फवारले जाते. यासाठी गंधक 80 % @ 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणीसाठी वापरले जाते गंधक कमतरता लक्षणे: ➡️ पिकांत जर गंधक ची कमतरता असेल तर नवीन शेंड्याकडील पानांत देठाजवळून फिक्कट पिवळेपणा दिसून येतो. ज्या जमिनींमध्ये सेंद्रिय पदार्थ कमी आहे किंवा रेतीयुक्त जमिनीत याची कमतरता दिसून येते. गंधक वापरासाठी स्रोत: ➡️ गंधक च्या वापरासाठी आपण सुरुवातीला बेसल डोस मध्ये अथवा उभ्या पिकांत देखील ड्रीप द्वारे व इतर खतांमध्ये पॉवर ग्रो सल्फर 90 %, पॉवर ग्रो सेलझीक, बेनसल्फ 90 %, कोसावेट फर्टीस 90 %, सल्फामॅक्स ग्रोमोर 90 %, झुआरी गंधक 90 % यांसारख्या खतांचा वापर करू शकतो. ➡️ तसेच सिंगल सुपर फॉस्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश, 20 : 20 : 0 : 13, विद्राव्य 0:0:50 यांसारख्या खतांमधून सुद्धा पिकास गंधक मिळते. काळजी: ➡️ गंधक मधून उष्णता निर्माण होत असल्यामुळे उन्हाळयात पिकांमध्ये याचा वापर करणे 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
0