गुरु ज्ञानAgrostar
खोडवा ऊस घेण्याची योग्य वेळ!
🎋खोडवा ऊस घेत असाल तर चांगले उत्पादन काढण्यासाठी खोडवा घेण्याची योग्य वेळ आणि योग्य नियोजन करणे फायदेशीर ठरते. नवीन ऊस लागवड आपण सुरु, आडसाली आणि पूर्वहंगामी अशा तीन हंगामामध्ये करतो. ऊस तुटून गेल्यानंतर त्याचा खोडवा ठेवला जातो. खोडवा उसातील उत्पादनाचा विचार केला तर योग्य नियोजन केल्यास पुर्वहंगामी खोडवा उसाचे उत्पादन हे सुरु आणि आडसाली खोडवा उसापेक्षा जास्त व चांगले मिळते.
🎋15 फेब्रुवारी नंतर घेतलेल्या खोडवा ऊसावर खोड किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो तसेच अधिक तापमानामुळे फुटव्यांच्या वाढीवर देखील परिणाम होतो त्यामुळे प्रभावी खोडवा उसाच्या व्यवस्थापनसाठी सर्वसाधारणपणे 15 फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या उसाचाच खोडवा ठेवावा.
🎋संदर्भ:Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.