सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
खोडवा ऊसामधील पाचट कुजविण्याचे व्यवस्थापन!
कुजलेल्या उसाच्या पाचटात सेंद्रिय कर्ब 28 ते 30 % तसेच नत्र 0.5, स्फुरद 0.2% व पालाश 0.7% असून एकरी सरासरी 3 ते 6 टन पाचट असते. • त्यामुळे ऊसतोडणीच्या वेळी पाचट ओळीत न लावता अथवा जाळून न टाकता ते जागच्या जागी ठेवावे तसेच शेतात एखाद्या ठिकाणी पाचटाचा ढीग राहिल्यास तो पसरून द्यावा. त्यानंतर उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला करून उसाचे बुडखे मोकळे करावेत. • उसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो व फुटव्यांची एकूण संख्या वाढते. • बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेच बुरशीनाशक सोबत क्लोरोपायरीफॉस 20% कीटकनाशक @2.5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारावे. त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा व किडींचा प्रतिबंध होतो. • त्यानंतर जैविक स्लरी (स्लरी तयार करण्यासाठी साठी गोमूत्र, शेणखत, गूळ, बेसन पीठ व ताक 200 लिटर पाण्यात मिक्स करून 2 ते 3 दिवस भिजवून ठेवावे करावे) करून त्यामध्ये पाचट कुजविणारे जिवाणू @1 किलो मिक्स करून जमिनीतून द्यावे (साधारण 1 टन पाचट कुजण्यासाठी). • वरील तयार केलेली स्लरी सडा शिंपडतो तशा रीतीने संपूर्ण शेतावर शक्यतो सायंकाळी शिंपडावी. • त्यानंतर उसाला पाणी द्यावे व पुढील 1 महिना ओल नियमित राहील याची काळजी घ्यावी. जमीन ओली असताना सरीतील पाचट पायाने थोडे दाबून द्यावे त्यामुळे पाचटाचा मातीशी संबंध येऊन ते हळूहळू कुजण्याची क्रिया सुरू होते. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
59
18
संबंधित लेख