गुरु ज्ञानAgrostar
खोडवा ऊसामधील पाचट कुजविण्याची प्रक्रिया!
👉🏻 कुजलेल्या उसाच्या पाचटात सेंद्रिय कर्ब 28 ते 30 % तसेच नत्र 0.5, स्फुरद 0.2 % व पालाश 0.7 % असून एकरी सरासरी 3 ते 6 टन पाचट असते.
👉🏻त्यामुळे ऊसतोडणीच्या वेळी पाचट ओळीत न लावता अथवा जाळून न टाकता ते जागच्या जागी ठेवावे तसेच शेतात एखाद्या ठिकाणी पाचटाचा ढीग राहिल्यास तो पसरून द्यावा. त्यानंतर उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला करून उसाचे बुडखे मोकळे करावेत.
👉🏻 उसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो व फुटव्यांची एकूण संख्या वाढते.
👉🏻बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेच बुरशीनाशक सोबत क्लोरोपायरीफॉस 20 % कीटकनाशक @ 2.5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारावे. त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा व किडींचा प्रतिबंध होतो.
👉🏻त्यानंतर जैविक स्लरी (स्लरी तयार करण्यासाठी साठी गोमूत्र, शेणखत, गूळ, बेसन पीठ व ताक 200 लिटर पाण्यात मिक्स करून 2 ते 3 दिवस भिजवून ठेवावे) करून त्यामध्ये पाचट कुजविणारे जिवाणू @ 1 किलो मिक्स करून जमिनीतून द्यावे (साधारण 1 टन पाचट कुजण्यासाठी).
👉🏻वरील तयार केलेली स्लरी सडा शिंपडतो तशा रीतीने संपूर्ण शेतावर शक्यतो सायंकाळी शिंपडावी.
👉🏻त्यानंतर उसाला पाणी द्यावे व पुढील 1 महिना ओल नियमित राहील याची काळजी घ्यावी. जमीन ओली असताना सरीतील पाचट पायाने थोडे दाबून द्यावे त्यामुळे पाचटाचा मातीशी संबंध येऊन ते हळूहळू कुजण्याची क्रिया सुरू होते.
🌱संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.