गुरु ज्ञानAgroStar
खोडवा ऊसाच्या अधिक उत्पादनासाठी महत्वाचे नियोजन!
- ऊस तुटून गेल्यानंतर ऊसाच्या बुडख्यांवर असलेले पाचट बाजूला सरीमध्ये लोटावे व वरून ऊसाचे बुडखे मोकळे करावेत जेणेकरून त्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे नवीन कोंब/फुटवे जोमदार येतील.
- उसाचे पाचट शक्य असल्यास बारीक करून अथवा तसेच एकसारखे जमिनीत पसरवून द्यावे. पाचट न जाळता जमिनीत कुजवल्यास अधिक फायदेशीर ठरते.
- उसाचे बुडखे जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनीखालील कोंब/डोळे फुटण्यास वाव मिळतो व फुटव्यांची एकूण संख्या वाढते.
- बुडख्यांच्या छाटणीनंतर सुरुवातीच्या अवस्थेत किड-रोग प्रादुर्भाव टाळण्यासाठी लगेचच मॅन्कोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% डब्लूपी घटक असणारे मँडोझ बुरशीनाशक @ 2.5 ग्रॅम व क्लोरोपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रीन 5% इसी घटक असणारे अरेक्स 505 कीटकनाशक @ 2 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन बुडख्यांवर तसेच पाचटावर फवारणी करावी.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.