क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
खोडवा आले पिकाचे नियोजन!
• आले लागवडीची जमीन उत्तम निचऱ्याची असेल, तर आले १४ ते १६ महिने जमिनीमध्ये ठेवून द्विहंगामी पीक (खोडवा) घेता येते. याचे उत्पादन पहिल्या वर्षीपेक्षा दीडपट ते दुप्पट मिळते. • या पिकास कंद सुकू नयेत, म्हणून पाणी देणे गरजे असते. • सर्वसाधारण परिस्थितीमध्ये देत असलेल्या पाण्याच्या ५० टक्के पाणी या काळात देणे जरुरीचे असते. सावलीसाठी सेंद्रिय पदार्थ जसे की उसाचे पाचट, आल्याचा पाला यांचे आच्छादन केल्यास ते फायदेशीर ठरते. • कलिंगड, काकडी यांसारख्या वेलवर्गीय पिकांची लागवड केल्यास, त्यांचे वेल गादी वाफ्यावर वाढवावेत. त्यामुळे आल्यास या वेलींच्या पानाचे आच्छादन होते आणि कंद गाभाळण्याचे प्रमाण कमी राहते. • तसेच जमिनीलगतच्या कंदांना इजा होत नाही. साधारणतः अकराव्या महिन्यानंतर आले पिकाच्या कंदास नवीन अंकुर फुटण्यास सुरवात होतो, तोपर्यंत या वेलवर्गीय पिकांची काढणी करावी. • खोडवा ठेवल्यानंतर एकदा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) @५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची आळवणी करावी. • जेणेकरून कंदकुजीचा प्रादुर्भाव होणार नाही. नवीन अंकुर फुटण्यास सुरवात होताच, सेंद्रिय खते वापरून हलकी भरणी करून संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
22
1
संबंधित लेख