AgroStar
खूशखबर! SBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची सुवर्णसंधी
नोकरीलोकमत
खूशखबर! SBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची सुवर्णसंधी
सरकारी बँकेतनोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आता एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरी मिळवण्याची संधी आहे. ज्या उमेदवारांनी आतापर्यंत एसबीआय स्पेशलिस्ट कॅडर अधिकारी आणि मॅनेजर पदासाठी अर्ज केला नसेल त्यांना आणखी एक संधी आहे. याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 जूनपासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी एसबीआयची अधिकृत वेबसाईट www.sbi.co.in/ Careers वर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून आहे. कोण करू शकतं अर्ज? ➡️ इंजिनियरियन फायर - यूजीसीकडून मान्यताप्राप्त विद्यापीठ / एआईसीटी द्वारे अनुक्रमित संस्थानातून नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेज (एनएफएससी), नागपुरमध्ये बीई (फायर) या बी.टेक (सेफ्टी एंड फायर इंजीनियरिंग) / बी.टेक (फायर टेक्नोलॉजी अँड सेफ्टी इंजिनियरिंग) / बी.एससी (फायर) असणे आवश्यक आहे. इंस्टीट्यूट ऑफ फायर इंजीनियर्स (भारत / यूके) तून पदवी, नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेज (एनएफएससी), नागपूरहून डिव्हीजनल ऑफिसर्स कोर्समध्ये पदवी असणे गरजेचे आहे. ➡️ मॅनेजर - कोणत्याही शाखेतील पदवी आणि एमबीए / पीजीडीएम. त्याव्यतिरिक्त, मानव संसाधन क्षेत्रामध्ये विशिष्ट प्रमाणपत्रे असणे गरजेचे आहे. बँकर्स / एनबीएफसी (1 फेब्रुवारी 2021 पर्यंत) मानव संसाधन क्षेत्रात कमीतकमी 7 वर्षांचा अनुभव (इंटर्नशिप सहित) असणे गरजेचे आहे. असा करा अर्ज ➡️ उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ https://bank.sbi/web/careers किंवा https://www.sbi.co.in/web/careers वर जाऊन स्वत:ची नोंदणी करणे गरजेचे आहे. तसेच उमेदवारांना ऑनलाईन अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. निवड प्रक्रिया ➡️ योग्य उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीच्या आधारे होईल. शॉर्टलिस्टिंग, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारे योग्य उमेदवारास मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत शंभर गुणांची असेल. निवडण्याचा अधिकार बँकेकडे असेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
14
इतर लेख